Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुख्याध्यापकाने दहावीच्या ८० मुलींना काढायला लावले शर्ट ; 'पेन डे' साजरा केल्याची शिक्षा

मुख्याध्यापकाने दहावीच्या ८० मुलींना काढायला लावले शर्ट ; 'पेन डे' साजरा केल्याची शिक्ष
 

झारखंडमधील धनबाद येथे एका खासगी शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.दहावीच्या विदार्थिनींना मुख्याध्यापकाने चक्क शर्ट उतरवण्याची शिक्षा दिली आहे. इतकच नाही तर त्यांना फक्त ब्लेझरवर घरी जाण्यास भाग पाडलं. फक्त दहावीच्या मुलींनी 'पेन डे' निमित्त एकमेकींच्या शर्टवर संदेश लिहिला होता. त्यावरून ही शिक्षा देण्यात आल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने एक समिती स्थापन केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

दहावीची परिक्षा झाल्यानंतर पुन्हा शाळेत एकत्र भेटता येणार नव्हतं. त्यामुळे मुलींनी एकमेकींच्या शर्टवर निरोपाचा संदेश लिहून ती आठवण जतन करण्यासाठी 'पेन डे' साजरा केला. मात्र विद्यार्थिनींचा हा प्रकार मुख्याध्यापकांना आवडला नाही आणि त्याने थेट शर्टवर संदेश लिहिलेल्या विद्यार्थींनींना त्यांनी शर्ट काढण्याचं फर्मान सोडलं. विद्यार्थिनींनी याबाबत माफीही मागीतली मात्र माफी मागूनही मुख्याध्यापकाचं समाधान झाले नाही.

विदार्थिनींना मुख्याध्यापकाने चक्क शर्ट उतरवण्याची शिक्षा दिली. इतकच नाही तर त्यांना फक्त ब्लेझरवर घरी जाण्यास भाग पाडलं. मुली घरी फक्त ब्लेझरवर आल्यामुळे पालकांना धक्काच बसला. त्यांनी तात्काळ शाळा गाठली आणि जाब विचारला. या घटनेनंतर धनबादमध्ये संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक आमदार रागिनी सिंह यांनी पालकांच्या मागणीचं समर्थन केलं असून ही घटना लाजिरवाणी आणि दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. तसंच पालकांसह मिळून त्यांनी पोलीस उपायुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. 
 
याबाबत माहिती देताना धनबादच्या पोलीस उपायुक्त माधवी मिश्रा म्हणाल्या की, काही पालकांच्या तक्रारी आमच्याकडे दाखल झाल्या आहेत. आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. तसंच एक समिती स्थापन करून या प्रकाराचा तपास सुरू आहे. समितीच्या निष्कर्षात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. याबाबत शाळेच्या प्रशासनाशीही आम्ही चर्चा करत आहोत. त्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शाळेचे हे लाजिरवाणे कृत्य खपवून घेतले जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.