‘तुझ्या…दम आहे का? आमच्यात दम आहे. एक नाही दोन सांभाळतोय, दोन्हींना तीन लेकरे आहेत.’, असे विधान धारशिवमधील मोर्चात आमदार सुरेश धस यांनी शनिवारी केले होते. त्या विधानावरुन आता जेष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आमदार सुरेश धस यांना घेरले आहे.
दोन बायकांच्या विधानावरुन आमदार सुरेश धस यांच्या अडचणी वाढवण्याची तयारी सदावर्ते यांनी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, प्रशासकीय अधिकारी यांना दोन बायकांचा अधिकार नाही. त्याला कुठे तरी प्रतिबंध घातला पाहिजे. याबाबत मुख्यमंत्री, पंतप्रधान, भाजप अध्यक्ष यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करून सुरेश धस यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आपण करणार आहोत, असे सदावर्ते यांनी म्हटले आहे.
सुरेश धस यांच्यावर कारवाईची मागणी करणार
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, आमदार सुरेश धस यांना 1946 च्या कायद्यानुसार दोन पत्नी असल्याचा बडेजाव करण्याची मुभा नाही. हे शील आचारसंहिताला खीळ घातल्यासारखे आहे. सुरेश धस यांनी प्रभू रामचंद्रची एक वचनी एक पत्नी हे वाक्य सुद्धा धुळीस मिळवले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, प्रशासकीय अधिकारी यांना दोन बायकांचा अधिकार नाही याला कुठे तरी प्रतिबंध घातला पाहिजे. याबाबत मुख्यमंत्री, पंतप्रधान, भाजप अध्यक्ष यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करून आमदार धस यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे.1946 चा कायदा हा बायकांच्या बाबतीत आहे. अपत्यांच्या बाबतीत नाही. कारण मंत्री धनंजय मुंढे यांनी अपत्या विषयी भारत निवडणूक आयोगकडे शपथपत्र दिले. त्यात पाच अपत्य असल्याचे म्हटले. मुंढे यांनी प्रतिज्ञा पत्रात दाखवलेली अपत्य सत्यच असेल ना. कारण अपत्यावरुन अपात्र करण्याचा कायदा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत दिसत नाही. पत्नीच्या बाबतीत कायदा आहे अपत्यांच्या बाबतीत तसा कायदा नाही.
धारशिव मोर्चाबाबत टीका
धारशिव मोर्चाबाबत टीका करताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, बेशरमपणाची काही लोकांची हद्द संपलेली आहे. नीचपणाची पातळी कुठपर्यंत जावी हे सुद्धा काही लोक विसरून गेले आहे. एखाद्याच्या मृत्यूवर किती राजकारण करावे त्याची सुद्धा मर्यादा संपली आहे. धाराशीवमध्ये जो मोर्चा झाला त्या मोर्चात जे वर्तन, भाष्य चुकीचे होते. तो मोर्चा अक्रोश मोर्चा वाटत नव्हता, असे सदावर्ते यांनी म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.