Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुश्रीफांच्या पालकमंत्रीपदाला हिंदुत्ववाद्यांचा विरोध, समोर आलं धक्कादायक कारण

मुश्रीफांच्या पालकमंत्रीपदाला हिंदुत्ववाद्यांचा विरोध, समोर आलं धक्कादायक कारण
 

कोल्हापूर: कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरून जातीयवाद उफाळून आला आहे. हसन मुश्रीफ पालकमंत्री नकोत अशी थेट भूमिका हिंदुत्ववादी संघटनानी घेतली आहे. हसन मुश्रीफ यांच्या ऐवजी नितेश राणे अथवा एकनाथ शिंदे यांना पालकमंत्री पद द्या अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशाराच त्यांनी दिला आहे.

सामाजिक सलोखा असलेल्या कोल्हापुरात नेमके काय घडतंय, असा प्रश्न शाहूनगरीत चर्चिला जात आहे. पालकमंत्री पदाच्या नेमणूका अद्याप झाल्या नसल्या तरी कोल्हापुरात मात्र पालकमंत्रीपदावरून वाद सुरू झाला आहे. पालकमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या हसन मुश्रीफ याना हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. विशाळगड सारखे संवेदनशील प्रकार कोल्हापुरात सध्या सुरू आहेत. हिंदुत्ववादी विचाराचा पालकमंत्री हवा अशी मागणी करत मुश्रीफ यांच्या नावाला उघड विरोध हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे.
मुश्रीफांच्या पालकमंत्रीपदासाठी विरोधाचे कारण काय?

कोल्हापुरात महायुतीला यावेळी भरभरून मतदान मिळाले आहे. कोल्हापूरातील 10 पैकी 10 जागांवर महायुती विजयी झाली आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी मतांचा आदर करत हिंदुत्ववादी पालकमंत्री मिळावा अशी मागणी होत आहे. यामध्ये नितेश राणे यांच्या नावासह देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाचा विचार करण्याची अपेक्षा हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. कोल्हापूरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनीही ही मागणी संघटनांच्या दृष्टीने रास्त असल्याचे म्हटले आहे. मात्र, शेवटी यावर वरिष्ठ निर्णय घेतील म्हणत सावध भूमिका व्यक्त केली आहे.

मुश्रीफ काय म्हणाले?
या सगळ्या प्रकारावर राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापूर ही शाहूंची भूमी असल्याचे त्यांनी सांगितले. हसन मुश्रीफ हे हिंदूंच्या मंदिरांचा जीर्णोद्धार, शिवजयंती उत्सव, किर्तन प्रवचन कार्यक्रम अशा कार्यक्रमात नेहमीच दिसून येतात.त्यांनी सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न नेहमीच कृतीतून दाखवून दिला आहे. मात्र, त्यांना होणारा विरोध नेमका का होतोय आणि कोल्हापूरचा जातीय सलोखा का बिघडतोय याचे उत्तर आता शोधण्याची गरज असल्याचा सूर सध्या उमटत आहे.

मागील काही वर्षांपासून कोल्हापूरही हिंदुत्ववादी असून पुरोगामी नसल्याची भूमिका आक्रमकपणे हिंदुत्ववाद्यंकडून मांडण्यात येत आहे. मागील काही वर्षात सामाजिक सलोखा जपणाऱ्या कोल्हापूरात धार्मिक दंगली उसळल्या आहेत. आता पालकमंत्रीपदाच्या विरोधासाठी धार्मिक कारण पुढं करण्यात आल्याने राजर्षी शाहूंच्य कोल्हपुरात नेमकं चाललंय काय, असा प्रश्न कोल्हापूरकरांनाही पडला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.