बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली असून अद्याप तीन आरोपी फरार आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता बीड जिल्ह्यात पुन्हा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
आणखी एका सरपंचाचे अपहरण करण्यात आल्याची माहिती समोर आले आहे. बीडमधील एका माजी सरपंच पायात कुलूप घातलेल्या अवस्थेत पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाला आहे. ज्ञानेश्वर इंगळे माजी सरपंचाचे नाव आहे. ते केज तालुक्यातील कळंब अंबा येथील रहिवासी आहेत. पंकजा मुंडे यांच्याकडून फंड देतो म्हणून केज मधून मुंबईला जायचे म्हणून गाडीत बसवले. पाटोदा येथे गेल्यानंतर तीन लाख रुपये काढून घेत एका खोलीत हात आणि पाय बांधून डाबून ठेवले. कशीतरी सुटका करून धावत पळून आलो.. अस पीडित सरपंचाने सांगितले.
सरपंचाच्या पायात कुलूप
या संदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे या माजी सरपंचाच्या पायात कुलूप लावलेले दिसत आहे. तर हाताला बांधलेले वण दिसत आहेत. यामुळे खळबळ उडाली असून याचा पोलीस तपास घेत आहेत.
सरपंचाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील दोन सरपंचांवर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती आहे. आज असेच एक प्रकरण समोक आले आहे. त्यामुळे सरपंचाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सरपंच पदावर काम करणाऱ्या व्यक्तींची सुरक्षितता पुन्हा एकदा धोक्यात आली आहे. पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासनाचे सरपंचांच्या अशा घटनेकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा पुन्हा असे प्रकार होत असल्याने पोलीस प्रशासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या भूमिकेवर आता पुन्हा एकदा संशय निर्माण झाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.