Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नांदेड :- मुख्याध्यापकाचा 10वीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार; गर्भपातही केला, खासदाराच्या शाळेतील धक्कादायक प्रकार

नांदेड :- मुख्याध्यापकाचा 10वीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार; गर्भपातही केला, खासदाराच्या शाळेतील धक्कादायक प्रकार
 

नांदेड : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या खासदाराच्या शाळेत मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीच्या गर्भपातानंतर ही घटना उघड झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या शाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यातील तामसा येथे हा प्रकार घडला आहे.

खासदार आष्टीकर यांच्या शाळेतील मुख्याध्यापक राजू सिंग चौहाण याने त्याच शाळेत शिकणाऱ्या दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार केले. मागच्या ऑगस्ट महिन्यात मुख्याध्यापकाने पीडित मुलीला नांदेडला नेऊन तिच्यावर अत्याचार केले आणि नंतर करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार सुरू ठेवले, यातून मुलगी गरोदर राहिली, त्यामुळे मुख्याध्यापकानेच मुलीचा गर्भपात केला. मुलीच्या कुटुंबाला हा प्रकार कळल्यानंतर याबाबत तामसा पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केला, त्यानंतर मुख्याध्यापक फरार झाला आहे.
खासदारांची प्रतिक्रिया

दरम्यान आरोपी मुख्याध्यापक राजू सिंग चौहान याला माझे पाठबळ नाही, ही घटना समजल्यानंतर आपण त्याला 9 तारखेला निलंबित केलं आहे, असं स्पष्टीकरण खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिलं आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी आपण पोलिसांकडे केल्याचं आष्टीकर म्हणाले आहेत. तसंच या घटनेच्या निषेधार्थ आज तामसा शहरात कडकडीत बंद पाडण्यात आला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.