आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे भारतात शेती प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने केली जाते. आता आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करणे आणखी सोपे झाले आहे.
त्यामुळे जास्त शेतकरी शेतातल्या बऱ्याच कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर करतात. परंतु, सर्वच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करणे शक्य होत नाही. यावर तोडगा म्हणून सरकारने ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू केली आहे. ही योजना काय आहे आपण जाणून घेऊया. ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी ५ लाखांपर्यंत अनुदान देत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ५० टक्के आणि ४० टक्के अशा दोन वेगवेगळ्या प्रमाणात अनुदान मिळणार आहे. यामुळे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील शेतकऱ्यांनाही आधुनिक शेती करणे सोपे जाईल, असा या योजनेमागील मुख्य हेतू आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतील. त्यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, सातबारा उतारा, जमिनीचा अ अकार, मोबाइल नंबर, ई-मेल आयडी, पासपोर्ट आकाराचे फोटो आणि जात प्रमाणपत्र यांचा समावेश आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. महाडीबीटी ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट आहे, येथे ऑनलाईन अर्ज सादर करून अनुदान मिळवता येईल.दरम्यान, ट्रॅक्टर अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. याचा लाभ घेऊन अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीत सुधारणा करू शकतात. तसेच, ट्रॅक्टरच्या मदतीने शेतकऱ्यांची अनेक कामे सोपे होऊ शकतात. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.