Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जमिनीचे 78 लाख रुपये ऑनलाईन चक्रीत गमावले

जमिनीचे 78 लाख रुपये ऑनलाईन चक्रीत गमावले



कुर्जुवाडी : सध्या मोबाईलवरील गेम्स तथा जुगाराने शहरी छागातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील युवकांनाही वेड लावले आहे. याची प्रचिती नुकत्याच लऊळ (ता. माढा) येथे घडलेल्या एका घटनेवरुन दिसून येते. एका तरुणाने साडे तीन एकर जमीन विकून आलेल्या मोबदल्यातील 78 लाख रुपये ऑनलाइन चक्री गेममध्ये गमावले. त्याने दिलेल्या फिर्यादीवरुन तिघांवर कुडूवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

फसवणूक झाल्याच्या घटनेनंतर अनेक महिन्यांनी बालाजी विष्णु खारे (वय 27 रा.लउळ ता. माढा) याने फिर्याद दिली. नितीन महादु पाटमस, रणजित महादेव सुतार, वैभव बाबु सुतार (सर्व रा. कुर्जुवाडी ता. माढा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. बालाजी खारे याच्या नावावर लऊळ हददीत 12 एकर शेती होती. त्यापैकी साडेतीन एकर जमीन 82 लाखात विकली होती. मागील एका वर्षापूर्वी फिर्यादीच्या गावातील एसटी स्टँडच्या झाडाखाली काही लोक व मुले ऑनलाइन गेम खेळत असल्याचे बालाजीने पाहिले होते. त्यावेळी बालाजीची नितीन पाटमस याच्याशी ओळख झाली. नितीनने बालाजीच्या मोबाइलवर ऑनलाइन चक्री गेमचे अॅप डाउनलोड करुन खेळण्यास प्रवृत्त केले. काही दिवसांनी बालाजीची रणजित महादेव सुतार व वैभव बाबू सुतार हे ओळखीचे झाले. तिघांनीही चलाखीने बालाजीची सातत्याने फसवणूक केली. बालाजीने एकूण 78 लाख रुपये ऑनलाइन चक्री गेममध्ये गमावले.
ग्रामीण युवकांची दिशाहीन वाटचाल

ग्रामीण भागातील युवक मोबाईलमधील जाळ्यात कमालीचे गुरफटले आहेत. घरच्या शेतीत कष्ट करण्याऐवजी झटपट पैसे मिळविण्यासाठी कोणताही मार्ग स्विकारु लागली आहेत. त्यात त्यांची मोठी आर्थिक हानी होताना दिसत आहे. शेतीचे काम सोडून लगतच्या शहरात ठिय्या मांडण्याची पध्दत रुढ होत चालली आहे. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.