दोन रुग्णांचा मिरजेतील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मिरजेत मृत्यू झालेल्यात हुक्केरी (जि. बेळगाव) येथील 14 वर्षीय मुलाचा आणि सांगोला (जि. सोलापूर) सांगोला येथील 60 वषार्रच्या वृद्धेचा समावेश आहे. कोल्हापूरमध्ये मृत पावलेली महिला चंदगड तालुक्यातील सोनारवाडी येथील आहे. दरम्यान, जीबीएसची लागण झाल्याने मृत्यू झालेल्यांची राज्यातील संख्या 9 वर पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
मिरजेतील शासकीय रुग्णालयात गेल्या 15 दिवसांत जिल्हा व जिल्ह्याबाहेरील 15 रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यापैकी 6 रुग्ण बरे झाले. त्यांना रुग्णालयातून घरी सोडले आहे. सध्या 7 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एक रुग्ण पुण्याला, तर एक कराडला उपचारासाठी गेला आहे. 15 रुग्णांमध्ये सांगली शहरातील 3 रुग्णांचा समावेश आहे. शहरात चिंतामणीनगर, विश्रामबाग आणि संजयनगरमध्ये 'जीबीएस'चे रुग्ण आढळले होते.
कर्नाटकातील हुक्केरी येथील 14 वर्षांच्या तरुणाला 'जीबीएस'ची लागण झाली होती. त्याला 31 जानेवारी रोजी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दुसरी रुग्ण महिला शासकीय रुग्णालयात गुरुवारी दुपारी दाखल झाली होती. ही महिला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील रहिवासी होती. तिचा मध्यरात्री मृत्यू झाला. नागरिकांनी घाबरू नये. उपचारानंतर रुग्ण पूर्णपणे बरे होतात. लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार घ्यावेत, असे आवाहन मिरज शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.