भाईचा रूबाबच न्यारा! वाल्मिक फोनवर बोलताना जेलचे सीसीटीव्ही कॅमेरे करतात बंद, कुटुंबाच्या आरोपाने खळबळ
बीड : खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला जेलमध्ये व्हीआयपी सुविधा मिळत आहेत. या संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष या माहितीमध्ये वेळ आणि तारखेसह उल्लेख करण्यात आलेला आहे. तसेच जेलमध्ये वाल्मिक कराड यांना मदत
करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे देखील आलेले आहेत, त्यामुळे खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहिती संदर्भात देशमुख कुटुंब जेल प्रशासनाकडे माहितीच्या
अधिकारात संपूर्ण माहिती मागणार आहे.
बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह इतर सहा आरोपी बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आहेत. यातील विष्णू चाटे फक्त लातूर कारागृहात आहे. बीड जिल्हा कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप देशमुख कुटुंबाने केला आहे. या प्रकरणात कारागृह प्रशासन आणि काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले असून, देशमुख कुटुंबाने माहिती अधिकारात (RTI) सीसीटीव्ही फुटेज मागण्याची तयारी केली आहे.
जेल प्रशासनाने आपले कर्तव्य पार पाडावे : धनंजय देशमुख
या संदर्भात बोलताना धनंजय देशमुख
म्हणाले, जेल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आरोपींना विशेष वागणूक देणे
थांबवावे, त्यांना नियमांप्रमाणेच वागणूक द्यावी. जेल प्रशासनाने आपले
कर्तव्य पार पाडावे, आरोपींना नियमांनुसार वागणूक द्यावी .
कारागृहातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून बाहेर संपर्क
तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे की, सुरक्षेच्या कारणास्तव औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात हलवण्याचे आदेश असतानाही वाल्मिक कराडला बीड कारागृहातच ठेवण्यात आले. त्याला जेलमध्ये नियमबाह्य सुविधा मिळत असून, मोबाईल, विशेष जेवण, आणि लांबच्या भेटींसाठी प्रशासनाकडून सहकार्य मिळत असल्याचा आरोप आहे. देशमुख कुटुंबाने आरोप केला आहे की, काही जेल अधिकारी आणि कर्मचारी संगनमताने वाल्मीक कराडला मदत करत आहेत. नियमबाह्य पद्धतीने भेटी घेतल्या जात आहेत. कारागृहातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून बाहेर संपर्क साधला जातो आणि विशेष सोयी-सुविधा पुरवल्या जात आहेत. असा आरोप करण्यात आला आहे.
वाल्मिक कराडला कोणत्या VIP सुविधा ?
वाल्मिक कराड यांना नियमबाह्य वस्तू व सेवा पुरवठाकर्मचाऱ्यांच्या फोनवरून फोन लावून देणेकारागृह प्रवेशावेळी कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांनी झडती न घेता त्याचे साहित्य आत नेले.विशेष चहा व अन्य साहित्य पुरवले.नियम मोडून वकीलपत्र थेट त्याच्यापर्यंत पोहोचवले.निकोटिन आणि नशायुक्त औषधे बाहेरून आणून दिली.कर्मचारी यांनी स्वतः खास चहा बनवून दिला.विशेष जेवण आणि तासभर भेट दिली.वकील भेटीच्या नावाखाली इतर सहकाऱ्यांना प्रवेश दिला.VC मुलाखती वेळेच्या मर्यादेपेक्षा जास्त दिल्या जात आहेत.कारागृहातील काही कर्मचाऱ्यांनी फोनद्वारे आरोपीच्या नातेवाईकांशी संपर्क साधला.DIG च्या आदेशानुसार वाल्मीक कराड यांना औरंगाबाद किंवा नाशिक येथे हलवायचे होते, पण ते अजूनही बीड कारागृहातच आहेत. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी देशमुख कुटुंबाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे. जेल प्रशासनाने यासंदर्भात असं काही घडलंच नाही, असा दावा केला आहे. मात्र कारागृहाचे वरिष्ठ अधिकारी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती काय सांगणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल..
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.