विट्यातील पत्रकारावरील हल्ला प्रकरणी दोषींची गय केली जाणार नाही!
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेला
ग्वाही
सांगली जिल्ह्यातील विटा येथील पत्रकारावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेने राज्यभरात या घटनेचा निषेध नोंदवत हल्लेखोरावर कडक कारवाई करावी. अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली होती.
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विटा येथील पत्रकारावरील झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेची गांभीर्याने दखल घेत विट्यातील पत्रकारावरील हल्ला प्रकरणी दोषींची गय केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांना या घटनेच्या बाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.