Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अँटिलिया स्फोटक प्रकरणी प्रदीप शर्मा यांना मोठा झटका!

अँटिलिया स्फोटक प्रकरणी प्रदीप शर्मा यांना मोठा झटका!
 
 
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी  यांच्या अँटिलिया  निवासस्थानाबाहेर स्फोटके आढळल्याच्या प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि निवृत्त एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा  यांना मुंबई न्यायालयाने जामीन नाकारला आहे.

त्यामुळे शर्मा यांची अडचण वाढली असून त्यांना पुन्हा अटक होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  आणि गृहमंत्री अनिल देशमुख असताना अँटिलिया स्फोटक प्रकरण घडले होते. मुंबईतल्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर महिंद्राच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत २० जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. या गाडीत अंबानी कुटुंबाला धमकी देणारी चिट्ठीही आढळली होती.

या प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले होते. त्यानंतर काही महिन्यांतच राज्यात सत्तांतर झाले आणि एकनाथ शिंदे  यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाले. मुंबईच्या विशेष एनआयए कोर्टाचे  न्यायाधीश ए. एम. पाटील  यांनी प्रदीप शर्मा यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या प्रकरणात आणखी एक आरोपी, वादग्रस्त इन्स्पेक्टर सचिन वाझे  यांच्यावरही गंभीर आरोप आहेत. सीसीटीव्ही फुटेजनुसार, ही स्कॉर्पिओ सचिन वाझे यांनीच तिथे ठेवल्याचे स्पष्ट झाले होते. ठाण्यातील एका व्यापाऱ्याची  ही स्कॉर्पिओ कार होती, आणि काही दिवसांतच त्याचा मृतदेह कळवा  येथील खाडीत आढळला. या हत्येचा आरोपही शर्मा आणि वाझे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. १७ जून २०२१ रोजी एनआयए  ने प्रदीप शर्मा यांना अटक केली होती. मात्र, २३ ऑगस्ट २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. आता मुंबई न्यायालयाने त्यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्याने त्यांना पुन्हा अटक होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.