देशाची राजधानी असलेल्या दिल्ली आणि एनसीआर परिसराला आज पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तिव्रता 4 इतकी नोंदवण्यात आली आहे. पहाटे 5 वाजून 36 मिनिटांनी हा भूकंप झाला.
भूकंपाचे केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किलोमीटर आतमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. साखर झोपेत असलेल्या दिल्लीकरांची यामुळे भांबेरी उडली. अनेकांनी धराबाहेर धाव घेतली. पाहटेच दिल्लीतील अनेक भागांमध्ये लोक घाबरुन घराबाहेर, इमारतींखाली रस्त्यावर उभे असल्याचं चित्र पहायला मिळालं. प्राथमिक माहितीनुसार या भूकंपामध्ये कोणतीही मोठी वित्तहानी झालेली नाही. तसेच या अपघातात कोणतीही जिवीतहानी अथवा कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.