महाकुंभमधील व्हायरल गर्ल मोनालिसा चित्रपटात एन्ट्री करणार आहे. तत्पूर्वी, तिला ब्रेक देणारे 'द डायरी ऑफ मणिपुर'चे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. असा दावा केला जात आहे की, मोनालिसा आता
एका सापळ्यात अडकली आहे. एका मुलाखतीत, बंगाल डायरी, राम की जन्मभूमी आणि
काशी टू कश्मीर चित्रपटांचे निर्माते जितेंद्र नारायण सेंगर उर्फ वसीम
रुजवी यांनी सनोज मिश्रा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
जितेंद्र नारायण सेंगर यांनी म्हटले की,
सनोज मिश्रा दारूच्या नशेत असतात आणि चित्रपटाच्या सेटवर सुद्धा दारू
पितात. दारू प्यायल्यानंतर त्यांना मुली पाहिजे असतात. जितेंद्र
नारायण सेंगर यांनी म्हटले की, सनोज मिश्रा यांनी अनेक चित्रपट बनविल्याचा
दावा केला आहे, परंतु त्यांचा एकही चित्रपट रिलिज झालेला नाही आणि त्यांनी
कोणती कमाई देखील केलेली नाही. सेंगर
यांनी म्हटले की, मोनालिसाचे कुटुंबिय खुपच साधे-भोळे आहे. आमच्या
चित्रपटाचे शुटिंग सीतापुरमध्ये सुरू होते. जिथे सनोज मिश्राने सेटवर दारू
पिण्यास सुरूवात केली होती, आणि तिथे उपस्थित महिलांसोबत गैरवर्तन केले
होते.
डायरेक्टर सनोज मिश्रा यांच्याबाबत म्हटले जात आहे की, महाकुंभमध्ये व्हायरल झालेल्या मोनालिसाचे कुटुंब अत्यंत साधे आहे. सनोज त्यांच्या घरी गेले आणि कोणतीही चौकशी न करता मोनालिसाच्या कुटुंबियांनी आपली मुलगी त्यांच्या स्वाधीन केली. जितेंद्र नारायण सेंगर यांनी आरोप केला की, उत्तर प्रदेशातील अनेक मुलींनी तक्रार केली आहे की, सनोज मिश्रा त्यांना अभिनेत्री बनविण्याचे आश्वासन देऊन मुंबईला घेऊन गेले होते, तिथे त्यांनी या मुलींसाबेत वाईट काम केले.मोनालिसा मध्यप्रदेशची आहे. महाकुंभमध्ये आपल्या डोळ्यांमुळे ती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ती इतकी व्हायरल झाली की महाकुंभमध्ये लोक तिचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी तिला त्रस्त करू लागले. याला वैतागून मोनालिसाने महाकुंभतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर डायरेक्टर सनोज मिश्रा तिच्या घरी पोहोचले आणि त्यांनी चित्रपटाची ऑफर दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.