Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'.तर घरात अब्बा देखील तुम्हाला ओळखणार नाही', नितेश राणेंची आक्रमक भाषा

'.तर घरात अब्बा देखील तुम्हाला ओळखणार नाही', नितेश राणेंची आक्रमक भाषा
 

“आज धर्म सभा आहे आणि धर्म सभेसाठी मला आमंत्रण दिलं गेलय. मी आमदार आणि मंत्री होण्याअगोदर एक हिंदू आहे, हे मी कधी विसरत नाही. त्यामुळे जिथे-जिथे माझ्या धर्मसाठी मला प्रवास करण्याची संधी मिळते, त्या संधीच सोन मी करतो.

माझ्या समाजाच्या लोकांशी मी संवाद साधतो” असं मंत्री नितेश राणे म्हणाले. ते चंद्रपूर येथे धर्म सभेसाठी आले आहेत. “काही लव्ह जिहाद, गो हत्येचे विषय नजरेसमोर आले आहेत. आता मी सरकारचा प्रतिनिधी आहे, म्हणून त्यांना कडक इशारा एकंदरीत सरकार बदलेलं आहे, याची जाणीव करुन देण्यासाठी आणि हिंदुत्ववादी विचाराच सरकार आहे याची जाणीव करुन देण्यासाठी तिथे चाललो आहे” असं नितेश राणे म्हणाले.
“धर्म सभेसाठी मी चंद्रपूरकडे चाललो आहे. लव्ह जिहाद आणि गो हत्या ही सगळी प्रकरण आम्हाला आमच्या महाराष्ट्रातून नष्ट करायची आहेत. लव्ह जिहाद करणारे जे जिहादी मानसिकतेचे हिरवे साप आहेत, त्यांना इशारा द्यायचा आहे की, सरकार आता हिंदुत्ववादी विचाराचं आहे. तुम्ही तुमचा बोऱ्या बिस्तरा बांधा. तुम्ही तुमची नाटक बंद करा. आता या राज्यात इस्लामीकरणाला प्रोत्साहन मिळणार नाही. आमच्या हिंदू बहिणींकडे वाकड्या नजरेने पाहणं बंद केलं नाही, तर सरकार म्हणून अशी कडक कारवाई होईल की, तुमच्या घरात अब्बा देखील तुम्हाला ओळखणार नाही” असं मंत्री नितेश राणे म्हणाले.

बिर्यानीसाठी मदत करणारे अधिकारी कोण?
बांग्लादेशी, रोहिंग्यावर कारवाई सुरु झाली आहे मालेगावमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्या प्रश्नावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, “सुरुवात आहे, मूळापर्यंत आम्हाला पोहोचायच आहे. ही जी कीड लागलेली आहे. बांग्लादेशी रोहिंगे महाराष्ट्रात येतात. त्यांना आमच्या महाराष्ट्रात जिहादीकरण करायचं आहे. त्यांचे चांगले मनसुबे नाहीत. आम्हाला त्याच्या मूळाशी जायचं आहे. नेमक त्यांना आणणारे कोण आहेत? त्यांन कागदपत्र बनवून देणारे कोण आहेत?” “प्रशासनात असे कोण अधिकारी आहेत, जे बिर्यानीसाठी त्यांना मदत करतात. या सगळ्यापर्यंत आम्ही पोहोचणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे, तशा कारवाया होताना दिसत आहेत” असं नितेश राणे म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.