सिव्हिल सर्जन असलेल्या माजी केंद्रीय मंत्र्याच्या लाडक्या भाच्याची चक्क मारामारी!
येथील जिल्हा रुग्णालयाच्या शल्य चिकित्सक डॉक्टरांनी चक्क सहकारी डॉक्टरला मारहाण केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री यांच्याशी संबंधित आहेत.
वैद्यकीय क्षेत्राला एक प्रतिष्ठा आणि सन्मान आहे त्याला विविध कारणे आहेत. ही प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी डॉक्टरांवर असते. मात्र नाशिकमध्ये घडलेल्या घटनेने सबंध वैद्यकीय क्षेत्रालाच विचार करण्यास भाग पाडले आहे.
येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी डॉ. आनंद पवार यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या क्रीडा स्पर्धा सुरू असताना हा प्रकार घडला. यावेळी राज्य शासनाच्या जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शिंदे यांनी अन्य डॉक्टरला बॅटने बेदम मारहाण केल्याची तक्रार केली आहे.
हा सर्व प्रकार क्रिकेटच्या मैदानात आणि चक्क रस्त्यावरच घडला. त्यामुळे तो चर्चेचा विषय झाला आहे. यावेळी जिल्हा रुग्णालयातील विविध डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी देखील उपस्थित होते. हा प्रकार कळल्यावर अन्य एका डॉक्टरने जखमी डॉ. पवार यांना रुग्णालयात दाखल केले. यासंदर्भात गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या संदर्भात पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. सध्या पोलीस निरीक्षक हे पुढील तपास करीत आहे. दोन डॉक्टरांमध्ये मारामारी झाल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित डॉ. शिंदे यांचा यापूर्वीचा इतिहासही असाच असल्याचे बोलले जाते. यापूर्वी त्यांनी धुळे, नंदुरबार तसेच एक एका मंत्राकडे विशेष अधिकारी म्हणून काम केले आहे.
यासंदर्भात डॉ शिंदे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे सांगितले. संबंधित डॉक्टर हे सातत्याने जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर नकारात्मक भूमिकेतून काम करतात. त्यामुळेच त्यांनी या संदर्भात खोटी माहिती दिली असावी असे सांगितले.
वैद्यकीय क्षेत्राला समाजात नेहमीच आदराने पाहिले जाते. जिल्हा शल्य चिकित्सक हे राज्य शासनाच्या वैद्यकीय विभागातील प्रतिष्ठेचे पद मानले जाते. नाशिकमध्ये मात्र एका वरिष्ठ डॉक्टरनेच मारहाणीचा प्रकार केल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.