वृत्तपत्र विक्रेता भवनमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करु - आमदार सुधिरदादा गाडगीळ
- वृत्तपत्र विक्रेता भवनमध्ये वाॅल कंपाउंड, शौचालय उभारणीस सुरवात
सांगली : वृत्तपत्र विक्रेता भवनचा परिपूर्ण वापर करता येईल अशा सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिले. सांगलीतील वृत्तपत्र विक्रेता भवनमध्ये वॉल कंपाउंड व शौचालयाच्या बांधकामाचा शुभारंभ आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी बोलत होते. यावेळी माजी महापौर गीताताई सुतार, माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई, माजी नगरसेविका गीतांजली ढोपे-पाटील, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कार्यकारणी सदस्य सचिन चोपडे, माजी राज्य कार्यकारणी सदस्य मारुती नवलाई, दरिबा बंडगर, सामाजीक कार्यकर्ते राहूल ढोपे पाटील या प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ करण्यात आला.
सांगली शहरात देशातील पहिले वृत्तपत्र विक्रेता भवन सांगली मिरज रोडवर ते त्रिकोणी बागेशेजारी उभारण्यात आलेले आहे. या ठिकाणी वृत्तपत्र विक्रेत्यांचे विविध कार्यक्रम, बैठका आयोजित केल्या जातात. त्याचबरोबर वृत्तपत्र क्षेत्रातील विविध घटकांसाठी या हॉलचा उपयोग होतो. त्यामुळे या ठिकाणी सुविधा असणे आवश्यक होते. त्याबाबत आमदार गाडगीळ यांनी निवडणुकीपूर्वी आश्वासन दिले होते, त्याप्रमाणे वृत्तपत्र विक्रेता भवन मध्ये वॉल कंपाऊंड व शौचालयाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
आमदार गाडगीळ म्हणाले, वृत्तपत्र विक्रेता हा समाजातील महत्वाचा घटक आहे.त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध झाल्यास सामान्य घरातील या मंडळीची सोय होणार आहे. यापुढेही आवश्यक ती मदत करु.
स्वागत सचिन चोपडे यांनी केले.ठेकेदार अभिजित मिरासदार यांनी कामाबाबत माहीती दिली.सुमारे अठरा लाख रुपये निधीतून वाॅल कंपाउंड, महीला व पुरुष स्वच्छतागृहे, मुतारी ही कामे करण्यात येणार आहेत.
प्रास्तविक करताना विकास सूर्यवंशी म्हणाले, आ.सुधिरदादांनी नेहमीच वृत्तपत्र विक्रेत्यांना बळ दिले आहे.महापूर, कोरोना अशा नैसर्गिक आपत्तीवेळी कायमच सुधिरदादा विक्रेत्यांच्या पाठीशी राहीले आहेत. वृत्तपत्र विक्रेता भवनमध्ये सुविधा देण्याचा शब्द पाळला व हे काम सुरु झाले. यापुढेही उर्वरित सुविधा दादा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी डाॅ निलेश शहा, निवृत्त कार्यकारी अभियंता सुमंत कुलकर्णी, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे जिल्हा सरचिटणीस विशाल रासनकर, सांगली शहराध्यक्ष सागर घोरपडे, मनपा क्षेत्र अध्यक्ष दीपक वाघमारे, गणेश कटगी, श्रीकांत दुधाळ, श्रीकांत पोरे, बजरंग यमगर, चांद मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते. राज्य संघटनेचे माजी कार्यकारणी सदस्य मारुती नवलाई यांनी आभार मानले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.