Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मला कोणी काम देत नाही. सचिन पिळगांवकरांच्या मनातील खंत; म्हणाले, कदाचित.

मला कोणी काम देत नाही. सचिन पिळगांवकरांच्या मनातील खंत; म्हणाले, कदाचित.



90 च्या दशकात सचिन पिळगांवकर, अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चांगलीच धमाल केली. सचिन पिळगांवकर यांनी त्यांचा काळ प्रचंड गाजवला. गायन, अभिनय, दिग्दर्शन अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी यशस्वी पद्धतीने काम करून दाखवले सचिन पिळगांवकर यांनी फक्त मराठीतच नव्हे तर हिंदीतही खूप काम केलं अभिनय, निमति, दिग्दर्शक, गायक अशा चतुरस्त्र भूमिका त्यांनी गाजवल्या.


त्यांनी दिग्दर्शित केलेले अनेक मराठी सिनेमे आजही तेवढेच चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी नवरा माझा नवसाचा 2 हा त्यांचा चित्रपट रिलीज झाला, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला चित्रपटाने तूफान कमाईदेखील केली.मात्र असं असलं तरी आता सचिन पिळगांवकर यांनी एक खंत व्यक्त केली आहे मला कोणी अभियन करण्यासाठी विचारणाच करत नाही, कोणी कामच देत नाही, अशी मनातचील सल त्यांनी मुक्काम पोस्ट देवाचं घर या चित्रपटाच्या ट्रेलर वेळी बोलून दाखवली.

या वेळी त्यांची मुलाखत घेण्यात आली, तुमचा आगामी चित्रपट कोणता ? कोणत्या भूमिकेत दिसणार आहात? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा सध्यातरी आता मी पडद्यावर येणार नाही. मोठ्या पडद्यावर दिसण्यासाठी माझ्याकडे सध्या कोणतेही काम नाही आणि मला कोणी कामही देत नाही. असे सचिन पिळगांवकर म्हणाले आमच्याकडे सिनेमात तुम्ही अभिनेता म्हणून काम करा, असं सांगायला कोणी माझ्याकडे येत नाही. ते माझ्याकडे का येत नाहीत, हे मला माहीत नाही. त्यांना कदाचित वाटत असेल की मी अॅक्टिंग सोडली असेल, पण तसं नाहीये. तो गैरसमज आहे, असेही सचिन पिळगांवकर यांनी स्पष्ट केलं.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.