Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुम्ही घर भाड्याने दिलंय, किंवा भाड्याच्या घरात राहताय? मग सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय वाचाच –

तुम्ही घर भाड्याने दिलंय, किंवा भाड्याच्या घरात राहताय? मग सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय वाचाच –


 

नवी दिल्ली : अनेकदा एकापेक्षा जास्त घरे/प्रॉपर्टी असेल तर ती भाड्याने देण्याकडे अनेकांचा कल असतो. यातूनच महिन्याला एक ठरावीक रक्कम मिळत राहते आणि त्याच माध्यमातून ते स्वतःचे घर देखील चालवतात. मात्र, अनेकदा भाडेकरू घरमालकाने सांगितले की जागा रिकामी करत नाहीत. आणि घरमालकाची अडचण करतात. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने अशाच प्रकरणात एक निकाल दिला असून, जो भाडेकरू आणि घरमालक अशा दोघांनीही जाणून घेणे महत्त्वाचे आहे. सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे की, भाडेकरूने कोणता भाग रिकामा करायचा, हे मालक ठरवेल. घरमालकाकडे आणखीही काही प्रॉपर्टी आहे, या कारणावरून तो घर रिकामं करायला नकार देऊ शकत नाही.

 

लाइव्ह लॉ या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, घरमालकाच्या गरजेनुसार भाडेकरूला संबंधित जागा रिकामी करायला सांगण्यासंबंधीचा कायदा आहेच. आपल्याला कोणती जागा रिकामी करून हवी आहे, याचा निर्णय घरमालकच घेऊ शकतो. यात भाडेकरू काहीही बोलू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. घरमालकाला गरज असल्याने भाडेकरूला जागा रिकामी करण्यास सांगितल्यावर त्याने मालकाकडे आणखी देखील जागा असल्याचे सांगत जागा रिकामी करण्यास नकार दिला होता. याबाबत घरमालकाने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर सुनावणी दरम्यान न्या. पंकज मिथल आणि न्या. एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
आपल्या दोन बेरोजगार मुलांसाठी एका घरमालकाला आपल्याच जागेत अल्ट्रासाउंड मशिन बसवायचे होते. आणि यासाठीच त्याने भाडेकरूला जागा रिकामी करायला सांगितले होते. हीच याचिका त्याने सत्र न्यायालयात देखील केली होती. मात्र, घरमालकाकडे आणखी जागा असल्याचे सांगत आपल्याला जागा रिकामी करायची गरज नसल्याचा युक्तिवाद भाडेकरूने केला होता. भाडेकरूचा हा युक्तिदाव मान्य करत सत्र न्यायालयाने ही याचिका फेटाळली आणि उच्च न्यायालयाने देखील कनिष्ठ न्यायालयाचाच आदेश कायम ठेवला. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद नाकारला. न्यायालयाचे म्हणणे होते की, घरमालकाची गरज जरी भागली असली तरीही तो भाडेकरूला जागा रिकामी करायला सांगू शकतो. आणि भाडेकरू त्याला नकार देऊ शकत नाही.

न्यायालय म्हणाले की, या प्रकरणात घरमालकाकडे आणखीही काही प्रॉपर्टी असू शकते. आणि आपल्या दोन बेरोजगार मुलांसाठी अल्ट्रासाउंड मशिन कुठे ठेवायचे, याची जागा जर त्याने ठरवली असेल, तर आपण त्याला दुसऱ्या जागेसाठी आग्रह करू शकत नाही, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. तसेच अल्ट्रासाउंड मशिन ठेवण्यासाठी ही उत्तम जागा असल्याचे लगेच लक्षात येते आहे. कारण या जागेच्या बाजूला एक दवाखाना आणि एक पॅथॅलॉजिकल सेंटर आहे. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.