Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धनंजय मुंडेंवर अटकेची टांगती तलवार, आणखी एक प्रकरण येणार अंगाशी? आज होणार निर्णय

धनंजय मुंडेंवर अटकेची टांगती तलवार, आणखी एक प्रकरण येणार अंगाशी? आज होणार निर्णय


बीड: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या समोरील अडचणी काही केल्या कमी होत नाहीयेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत.

वाल्मीक कराडशी धनंजय मुंडे यांचे असलेले निकटचे संबंध पाहता, संतोष देशमुख प्रकरणाशी धनंजय मुंडेंचं नाव जोडलं जातंय. तसेच परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात देखील धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं जातंय. हे कमी होतं म्हणून की काय अलीकडेच करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या खटल्यात धनंजय मुंडे यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. घरगुती हिंसाचार प्रकरणात मुंडेंना अंशत: दोषी ठरवण्यात आलं आहे.

या सगळ्या घडामोडीनंतर आता आणखी एक प्रकरण धनंजय मुंडेंच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीस धनंजय मुंडे हजर राहिले नाहीत, तर त्यांच्या विरोधात अटक वॉरंट निघू शकतं, असं कायदेतज्ज्ञांचं मत आहे. यामुळे कोर्ट काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

नेमकं प्रकरण काय ?


खरं तर, विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडविल्याबाबत करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात अलीकडेच एक ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने परळीच्या फौजदारी न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. याबाबत आज परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडे आज न्यायालयात हजर राहिले नाहीत, तर त्यांच्याविरोधात अटक वॉरंट निघून शकते, असं तक्रारदाराचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी सांगितलं.

धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी दाखल उमेदवारी अर्जासोबत जे शपथपत्र दाखल केलं होतं, त्यात त्यांनी पत्नी राजश्री मुंडे आणि ३ मुली तसेच करुणा मुंडे यांच्या २ मुलांचा उल्लेख केला होता. मात्र करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख त्यांनी केला नव्हता. त्यांनी वरील खरी माहिती लपवल्याबाबत करुणा मुंडे यांनी बीड येथून परळीच्या फौजदारी न्यायालयात 'ऑनलाइन' तक्रार दाखल केली होती. तक्रारीची मूळ कागदपत्रे ५ फेब्रुवारी २०२५ रोजी न्यायालयासमोर दाखल केली. त्यावरून न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला. त्यावर आज सुनावणी होणार असून न्यायालयात काय निर्णय देणार या कडे सर्वांच लक्ष लागलं आहे..

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.