राज्यात सध्या महायुतीचे सरकार आले असून बांगलादेशी व रोहिंग्याचा शोध घेतला जात आहे. अनेक प्रकरणात यांचा हात असल्याचे समोर आल्यानंतर आता राज्य सरकारने कडक पावले उचलली आहेत.
अशातच भाजपचे नेते तथा राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी बांगलादेशी व रोहिंग्यांवरून पुन्हा एकदा मुस्लिम समाजाला टार्गेट केलं आहे. त्यांनी चंद्रपूर येथील सभेत यावरून लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित करताना, आता राज्यात हिंदूचे रक्षण करणारे सरकार आले आहे. आता धर्मांतर खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे. तर राज्यात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा आणू, बांगलादेशी व रोहिंग्याचा शोध घेऊन त्यांना परत पाठवू, असे आश्वासन दिले आहे.
नितेश राणे यांनी चंद्रपूरमधील गांधी चौक येथे आयोजित हिंदू धर्म सभेत मुस्लिम समाजाला टार्गेट केलं. यावेळी त्यांनी, राज्यात सर्वत्र हिरव्या सापांची वळवळ सुरू आहे. लव जिहाद प्रकरणातून हिंदू मुलींची केली जातेय. त्यांची वळवळ कमी झाली नाही तर प्रत्येकाला आतमध्ये टाकू हेच सांगायला येथे आलोय. त्यामुळे हिरवा रंग धारण करणाऱ्या सापानी वळवळ थांबवावी, गो हत्या बंद करा, अन्यथा प्रत्येक वॉर्डात आता वराह जयंती करावी लागेल असा इशारा दिला आहे. तसेच यासाठी आम्हाला कोणाची परवानगी काढावी लागणार नसून सरकारच आमचं आहे. हे सरकार हिंदूचे असल्याचेही नितेश राणे म्हणाले.तसेच राज्यात परत महायुतीचे सरकार येण्यामागे सर्व हिंदू विचाराचे लोक आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील कडवट हिंदू मुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिनिधी म्हणून राज्य सरकारमध्ये आहेत. त्यामुळे आता कोणती चिंता नाही. सरकारी यंत्रणाही आमच्या हातात आहेत. यामुळे कोण अवेळी बिर्याणी खातो आणि कोण कोण कुणाची दाडी कुरवाळतो याची माहिती मिळते असेही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.हिंदू समाजातील मुलीचे आयुष्य जिहादी उद्ध्वस्त करत असून हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याला येथे स्थान नाही. राज्यात आता हिंदू समाजाचे बाप सरकार आहे. उगाच राज्यात वळवळ करायची नाही अन्यथा गाठ माझ्याशी आहे. जे शाहरुख व सलमान खान आमच्या हिंदू बहिणीकडे वाकड्या नजरेने बघत असेल त्याला माझ्याकडे आणा, त्यांची नावे द्या, त्यांचा तिथेच बंदोबस्त व कार्यक्रम करू. आता धर्मांतर खापवून घेणार नसून लवकरच राज्यात धर्मांतर विरोधी कायदा आणू. महविकास आघाडी सरकारच्या काळात हे सर्व चालले. आता चालणार नाही. नक्कीच मंत्रालयात तिरंगा झेंडा फडकातोय. मात्र त्यापेक्षाही मोठा भगवा झेंडा मंत्रालयावर फडकतोय हे विसरू
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.