छत्रपती शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या? दरवर्षी 19 फेब्रुवारीला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज हे वैभव, शौर्य, दया आणि औदार्य याचे प्रतीक होते. शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळील वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर झाला. तसेच शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले. एका आख्यायिकेत सांगितल्यानुसार, शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती, त्यामुळेच या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोंसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली. तसेच त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आहे, ज्या सिंदखेडच्या लखुजी जाधवरावांच्या कन्या होत्या. शिवाजी महाराज हे मराठा कुटुंबातील आणि भोसले कुळातील राजे होते.
महाराष्ट्र राज्यात सगळीकडे मोठ्या आनंद आणि उत्साहात शिवजयंती साजरा केली जाते. 19 फेब्रुवारीला राज्यातील अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याशिवाय भव्य मिरवणुका, मराठ्यांचा समृद्ध आणि व्यापक सांस्कृतिक वारसा जपला जातो. आज आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या? त्यांची नावे काय? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
पुण्यातील लाला महालात 16 मे 1640 रोजी बालपणीच छत्रपती शिवाजी
महाराजांचा जन्म सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला. त्या शिवरायांच्या प्रथम पत्नी होत्या. फलटणचे मुधोजीराजे निंबाळकर हे सईबाईंचे वडील होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव सोयराबाई मोहिते असे होते. छत्रपती राजाराम राजे यांच्या त्या आई होत्या. याशिवाय मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या सोयराबाई बहीण होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या पत्नी पुतळाबाई पालकर या बाजी प्रभू प्रधान यांच्या कन्या होत्या. राजांच्या देहावसाननंतर या त्याकाळी सती म्हणून त्यांच्या चितेवर गेल्या होत्या.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सकवारबाई गायकवाड या नांदोजी राव गायकवाड यांच्या कन्या होत्या. सकवारबाई गायकवाड यांचा विवाह शिवाजी महाराजांसोबत 1657 मध्ये झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाचव्या पत्नीचे नाव सगुणाबाई शिर्के असे होते. जाधव घराण्यातील काशीबाई जाधव या शिवाजी महाराजांच्या सहाव्या पत्नी होत्या. त्यांचा विवाह सोहळा 7 एप्रिल 1657 रोजी झाला. काशीबाई या जिजामातांच्या जाधव कुटुंबातील होत्या आणि त्या शंभूसिंह बांदल यांच्या बहिणी होत्या. विचारें घराण्यातील लक्ष्मीबाई विचारें या शिवाजी महाराजांच्या सातव्या पत्नी होत्या. गुणवंताबाई इंगळे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठव्या पत्नी होत्या. 15 एप्रिल रोजी भोसल्यांशी सोयरिक होऊन गुणवंताबाई शिवरायांच्या पत्नी झाल्या झाल्या, असा उल्लेख जेधे शकावलीमध्ये आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.