Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'अमित शाहांनी शब्द पाळला नाही, फसवणूक झाल्याची एकनाथ शिंदेंची भावना'

'अमित शाहांनी शब्द पाळला नाही, फसवणूक झाल्याची एकनाथ शिंदेंची भावना'
 

राज्यात महायुती सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. मंत्रिमंडळाच्या शपथविधीपूर्वी, त्यानंतर पालकमंत्रीपद जाहीर झाल्यानंतर शिंदे दरे या मूळ गावी गेले होते. त्यामुळं त्यांच्या नाराजीच्या चर्चेला सातत्याने बळ मिळत आहे. अनेकदा एकनाथ शिंदे यांनी नाराजीच्या चर्चांना फटकारले आहे. अशातच, राजकीय वर्तुळात शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या मनोमिलनाच्या चर्चेनं उधाण आलं आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या खासदाराने अमित शाहांनी शब्द पाळला नाही, फसवणूक झाल्याची एकनाथ शिंदेंची भावना असल्याचा दावा केला आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री तुम्हालाच करण्यात येईल असा शब्द दिला होता. तो त्यांनी पाळला नाही, आपली फसवणुक झाले आहे. अशी भावना शिंदेंच्या मनात आहे. अपमानित केल्याच्या दुःखातून शिंदे हे बाहेर बडायला तयार नाहीत. त्यामुळेच दुःखाचा कडेलोट झाल्यानंतर ते आपल्या सातारा जिल्ह्यातील दरे गावी जातात, अशा खळबळजनक खुलासा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुखपत्र सामनाच्या रोखठोकमधून केला आहे. 

शिंदे यांनी प्रचंड पैसा निवडणुकीत टाकला, पण शहा यांनी...

"निवडणुका तुमच्याच नेतृत्वाखाली लढवू व 2024 नंतरही पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री असाल, चिंता करू नका. निवडणुकीत सढळ हस्ते खर्च करा, असे आश्वासन अमित शहा यांनी शिंदे यांना दिले होते. शिंदे यांनी प्रचंड पैसा निवडणुकीत टाकला, पण शहा यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही व आपली फसवणूक झाली असे शिंदे यांना वाटते. असं आमदार महोदय सांगत असल्याचे राऊतांनी सांगितलं आहे. तसेच, शिंदे व त्यांच्या लोकांचे फोन टाप केले जात आहेत असे शिंदे यांना खात्रीने वाटते व दिल्लीच्या एजन्सी आपल्या हालचालींवर पाळत ठेवून असल्याचा शिंदे यांना संशय आहे, पण शिंदे यांची पुरती कोंडी आता झाली आहे. असही आमदार महोदय सांगत असल्याचे राऊतांनी म्हटलं आहे.
तसेच, महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीत आज शिंदे व त्यांचे लोक कोठेच दिसत नाहीत. मुख्यमंत्री म्हणून शिंदेंवर झोत होता तो संपला आहे व मुख्यमंत्री फडणवीस आपल्याला विचारीत नाहीत या दु:खात स्वत: शिंदे अखंड डुंबले आहेत. फडणवीस व शिंदे यांच्यात वरवरचे बोलणे आहे व मंत्रिमंडळांच्या बैठकांनाही उपमुख्यमंत्री शिंदे हजर राहत नाहीत हे सत्य आहे. दु:खाचा कडेलोट झाला की, उपमुख्यमंत्री शिंदे हेलिकाप्टरने साताऱयातील दरेगाव गाठतात व डोके थोडे शांत झाले की, ठाण्याला परत येतात, पण डोके शांत झाले तरी त्यांचे मन:स्वास्थ्य सुधारत नाही.

एकनाथ शिंदे यांचे मन:स्वास्थ्य आता इतके बिघडले आहे की, ते आता आमदारांवरच चिडचिड करतात असा खुलासा त्यांच्याच एका प्रिय आमदाराने केला. शासकीय बैठकांना शिंदे दोन तास उशिरा पोहोचतात. दि. 30 रोजी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक वर्ल्ड ट्रेड सेंटरला झाली. त्या बैठकीत शिंदे किमान अडीच तास उशिरा पोहोचले. त्यांचे कामात मन रमत नसल्याचे हे लक्षण. शिंदे हे बैठकांना उशिरा पोहोचतात व त्यामुळे सगळय़ांचाच खोळंबा होतो अशी पार भाजपच्या आमदारांनी आता मुख्यमंत्र्यांकडे केली.

फडणवीस हे आज सरकारचे प्रमुख आहेत व शिंदे हे कालपर्यंत त्याच सरकारचे प्रमुख होते व आता दोघांचे पटत नाही. "मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये फार मोठे मतभेद नाहीत." असे भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्याने मला अलीकडेच सांगितले. (म्हणजे लहानसहान मतभेद आहेत. उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्यातही फार मोठे मतभेद नव्हते. असलेच तर ते लहानसहान मतभेद असतील, पण पुढे काय झाले ते देशाने पाहिले.) चित्र असे आहे की, शिंदे यांच्या बहुतेक आमदारांत आता चलबिचल आहे. त्यातील एक मोठा गट थेट भाजपात जाऊन देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व स्वीकारण्याच्या तयारीत आहे.
दुसरा गट शिंदेंवर दबाव आणीत आहे. झाले गेले विसरून पुन्हा स्वगृही परतू, या चर्चा जोरात आहेत, पण केंद्रीय तपास यंत्रणांच्या भयामुळे नेते निर्णय घेत नाहीत व गुलियन बारी सिन्ड्रोमच्या आजाराप्रमाणे हातापायांना आणि मेंदूलाही मुंग्या आल्याचा भास या सगळय़ांना होतो आहे. हे चित्र गमतीचे आहे. शिंदे गटातले मोजके लोक मंत्री झाले व उरलेले पैसा व ठेकेदारीच्या उबेवर जगत आहेत. शिंदे या सगळय़ांचे नेतृत्व किती काळ करू शकतील? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.