Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फाईल्स अडकवल्या, समितीतून वगळल...महायुतीत शिंदेंसोबत नेमकं घडतंय तरी काय?

फाईल्स अडकवल्या, समितीतून वगळल...महायुतीत शिंदेंसोबत नेमकं घडतंय तरी काय?
 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील नव्या आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये अजित पवार यांचा समावेश आहे. मात्र, एकनाथ शिंदेंचा समावेश नाही. इतकेच नव्हे तर शिंदेंच्या लोकप्रिय ठरलेल्या योजनादेखील बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. फडणवीसांच्या या सर्वभूमिकेमुळं राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.  मुंबईतील जुलै २००५ सालच्या पुरानंतर ही स्थापन करण्यात आलेल्या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे राज्याचे मुख्यमंत्री असतात. त्यानुसार या समितीचे अध्यक्षपद आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले आहे.

आपातकालीन परिस्थितीत ही समिती मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे काम करते. या समितीत अजित पवार यांच्यासह महसूल, मदत व पुनवर्सन, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य समितीचे मंत्र्याचा समावेश करण्यात आला आहे. विशेष करून एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं असूनही त्यांना या समितीतून वगळ्यात आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

दरम्यान, मुख्यमंत्री असतांना एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या 'आनंदाचा शिधा', तसेच 'तीर्थ दर्शन' योजनांना देखील नव्या सरकारने ब्रेक लावला आहे. त्याचबरोबर नव्या सरकारमधील मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक आणि विशेष कार्यकारी अधिकारी नेमण्याच्या मुद्यावरूनही शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रचंड नाराज असल्याची माहितीदेखील समोर आली आहे.  शिवसेनेच्या मंत्र्यांच्या पीए आणि ओएसडी नेमण्याच्या ऑर्डर रखडल्या आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भातील फाईल्स मुख्यमंत्री कार्यालयात पडून आहेत. महायुतीतील ही परिस्थिती पाहता शिंदेंसोबत महायुतीत नेमकं काय घडतंय? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.