Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- सावर्डेत औषध निर्माण अधिकाऱ्यास मारहाणअधिकाऱ्यांना शिवीगाळ : पोलिसात फिर्याद

सांगली :- सावर्डेत औषध निर्माण अधिकाऱ्यास मारहाण अधिकाऱ्यांना शिवीगाळ : पोलिसात फिर्याद
 

तासगाव : सावर्डे (ता. तासगाव) येथील - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य पथकाकडील औषध निर्माण अधिकारी जालिंदर महादेव कांबळे यांना टी.टी.चे इंजेक्शन का देत नाहीस, असा जाब विचारत सावर्डे येथील गजेंद्र शिवाजी पाटील याने शिवीगाळ करत मारहाण केली. तर वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा पाटील यांना शिवीगाळ केली. याप्रकरणी कांबळे यांनी गजेंद्र पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सावर्डे येथे जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य पथक आहे. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी आणि औषध निर्माण अधिकारी कार्यरत आहेत. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील या मासिक अहवाल देण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे गेल्या होत्या. याचवेळी तात्यासाहेब जगन्नाथ सदाकळे यांना जखम झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी, गजेंद्र शिवाजी पाटील हा आरोग्य पथकात घेऊन आला होता. यावेळी औषध निर्माण अधिकारी कांबळे यांनी सदाकळे यांचा केस पेपर नोंद करून त्यांच्यावर औषधोपचार केला. मात्र, यावेळी गजेंद्र पाटील याने कांबळे यांच्यासोबत वाद घालून शिवीगाळ केली. 'टीटीचे इंजेक्शन का देत नाहीस?' असा जाब विचारत शिवीगाळ करू लागला.
यावेळी त्यांनी 'याठिकाणी इंजेक्शन देण्याची सोय नाही. तुम्ही चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जा,' असे समजावून सांगितले. मात्र, पाटील याने शिवीगाळ करत, दवाखान्यातील साहित्य विस्कटून लावले. दवाखान्याबाहेर ओढत नेत चप्पलने मारहाण केली. त्याचवेळी डॉक्टर पाटील त्याठिकाणी आल्या, त्यांनी पाटील याला 'मारहाण कशासाठी करत आहेस? असे विचारले असता, पाटीलने डॉ. पाटील यांनाही शिवीगाळ केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.