Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'ते संविधान परत छापा. बघू कोण विरोध करतं'; राज्यपाल हरिभाऊ बागडेंच्या वक्तव्याने नवा वाद?

'ते संविधान परत छापा. बघू कोण विरोध करतं'; राज्यपाल हरिभाऊ बागडेंच्या वक्तव्याने नवा वाद?
 

नाशिक: राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे यांनी नाशिकमध्ये केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी वक्तव्य केले. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या मूळ प्रतीत महापुरुषांचे फोटो असल्याचा दावा हरिभाऊ बागडे यांनी केला.संविधानाची मूळ प्रत पुन्हा छापावी, त्याला कोण विरोध करतो हे बघू असं वक्तव्य हरिभाऊ बागडे यांनी केले.

सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं दिला जाणारा कार्यक्षम आमदार हा पुरस्कार यावर्षी भाजपचे आमदार आशिष शेलार यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना हरिभाऊ बागडे बोलत होते. यावेळी आपल्या भाषणात हरिभाऊ बागडे यांनी शेलारांचे कौतुक केले. त्यांनी पुढे म्हटले की, नाशिक शहर प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आहे. पण याच ठिकाणाहून सितेचं हरण झालं. आजही काही घरांमध्ये सीतेला वनवास भोगावा लागतो असंही त्यांनी म्हटले.

हरिभाऊ बागडे यांनी काय म्हटले?
रहिु नाशिक शहरात काळाराम मंदिर आहे, त्याच मंदिरात डॉ.बाबसाहेब आंबेडकर येऊन गेले आहेत. मी याच शहरात कुसुमाग्रजांना भेटलो होतो. मी अन्न पुरवठा मंत्री होतो तेव्हा कुसुमाग्रजांना भेटलो होतो, त्यावेळी रेशन कार्डवर त्यांची कविता छापली होती. बाबासाहेबांनी हे संविधान लिहिलं ते छापलं नाशिकच्या प्रेसमध्ये, इंग्लिशमध्ये होते त्याचं हिंदीमध्ये भाषांतर करण्यात आलं. त्या संविधानामध्ये अनेक चित्रं होती, पण ती काढली. आता आपण परत आवाज उठवला पाहिजे. आपण भारत मातेचे पुत्र म्हणून ही मागणी केली पाहिजे, मग बघू कोण विरोध करतं, असंही त्यांनी म्हटले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.