बच्चन कुटुंब सध्या वेगळ्याच अडचणीत आहे. ती अडचण आहे, प्रसारमाध्यमांत येणाऱ्या खोट्या बातम्यांची. दोन वर्षांपूर्वी खोट्या बातम्यांविरोधात अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय-बच्चन हे दोघीही सोशल मीडियावर येणाऱ्या खोट्या बातम्यांबाबत हायकोर्टात गेले होते.
आता त्यांची लेक आराध्या बच्चनचे प्रकरणही थेट हायकोर्टात गेले आहे. आराध्या आजारी असल्याच्या बातम्या काही यू-ट्यूबर्सने केल्या आहेत. त्याविरोधात आराध्या हायकोर्टात गेली असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणाची आता १७ मार्चला सुनावणी आहे.
नेमकं प्रकरण काय?
बच्चन कुटुंब कायम चर्चेत असतं. त्यातील बऱ्याच चर्चा खोट्या असतात. अमिताभपासून जया बच्चनपर्यंतच्या बातम्या नेहमीच येतात. शिवाय बच्चन कुटुंबाच्या दुसर्या पिढीच्या बातम्यांनाही चांगले व्ह्यूज मिळतात. त्यामुळे सोशल मिडिया व यूट्यूबर्सही अभिषेक बच्चन व ऐश्वर्या बच्चन यांच्या बातम्या कायम चालवतात. काही दिवसांपूर्वी अभिषेक-ऐश्वर्याचा घटस्फोट होणार या बातम्या चालत होत्या. काही दिवसांनी घटस्फोटाच्या बातम्या खोट्या असल्याचं सिद्ध झालं. आता मात्र बच्चन कुटुंबासमोर वेगळीच अडचण आली आहे. बच्चन कुटुंबाची तिसरी पिढी म्हणजेच आराध्या बच्चन ही आजारी असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून सुरु झाल्या आहेत. आता याविरोधात थेट आराध्या बच्चन यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.
हायकोर्टात घेतली धाव
काही यूट्यूब चॅनल्सने आराध्याच्या तब्येतीबाबत अफवा पसरवल्याच्या घटना समोर आल्या होत्या. आराध्या आजारी असल्याच्या अशा खोट्या गोष्टी व्हिडिओमध्ये सांगण्यात आल्या होत्या. या फेक न्यूजमुळे संतापलेल्या बच्चन कुटुंबाने 2023 मध्ये हायकोर्टात याचिका दाखल करून असे व्हिडिओ काढून टाकण्याची मागणी केली होती. अशा रिपोर्टिंगवर बंदी घालण्याची मागणी केली होती. 2023 मध्ये आराध्या अल्पवयीन असल्याचे सांगून, अशा खोट्या बातम्या देणं बंद करण्याबद्दल मागणी करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने आराध्या बच्चनच्या प्रकृतीशी संबंधित सर्व व्हिडिओ यूट्यूब प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचे निर्देशही दिले होते. मात्र आता पुन्हा एकदा याच प्रकरणाबाबत पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला.
मार्च महिन्यात सुनावणी
दोन वर्षांपूर्वी यूट्यूबर्सना सांगूनही या बातम्या बंद झाल्या नाहीत. त्यामुळे आता 2025 मध्ये आराध्याचे पालक म्हणून ऐश्वर्या राय आणि अभिषेकने दिल्ली उच्च न्यायालयात पुन्हा नव्याने अर्ज दाखल केला आहे. या नव्या अर्जानुसार दिल्ली उच्च न्यायालयाने गुगलसह काही वेबसाइटला नोटीस पाठवली आहे. आराध्याच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, काही यूट्यूबर्स अद्याप हजर झाले नाहीत. तसेच त्यांचा बचाव करण्याचा अधिकार आधीच बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी पुन्हा 17 मार्च रोजी होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.