Breaking News! शरद पवार गटाच्या बड्या नेत्याच्या घरावर आयकर विभागाची धाड
आज सकाळी सहा वाजता विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू रघुनाथराजे नाईक निंबाळकर व संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी ईडीने छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात केंद्रीय तपास यंत्रणाच्या तीन वाहनांनी फलटण येथील त्यांच्या घराच्या दिशेने आज सकाळी प्रवेश केला आणि त्यानंतर थेट चौकशी करण्यास सुरुवात केली. ही माहिती कळताच फलटणचे माजी आमदार दीपक चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यासमोर जमा झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, प्राथमिक मिळत असलेल्या माहितीनुसार दूध प्रकल्पाशी संबंधित ठिकाणी तपासणी व चौकशी जात असल्याची स्थिती असून अशा संदर्भातील तपासाची चर्चा आहे. इंदापूर तालुक्यातही अशी तपासणी सुरू आहे.
फलटणचे रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समर्थनात असून त्यांनी सातारा जिल्ह्यातील व पश्चिम महाराष्ट्रातील काही राजकीय घराणे शरद पवारांच्या पक्षाकडे आणण्यासाठी प्रयत्न केले होते, तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तटस्थ भूमिका घेत आपल्याच पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम केल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर वाच्यता केली होती.
भाजपचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या माढा लोकसभेच्या पराभवात फलटणच्या याच राजे घराण्याचा मोठा हातभार असल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर राजकीय आकसाने ही कारवाई होत असल्याची भावना रघुनाथराजे व संजीवराजे यांच्या समर्थकांमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या घरी तपास यंत्रणाचे अधिकारी पोहोचले याची माहिती मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांची देखील तेथे गर्दी झाली.
दूध प्रक्रिया संघांशी संबंधित अनेक ठिकाणी आज केंद्रीय तपास यंत्रणा व अन्नभेसळ प्रतिबंधक खात्याच्या पथकाने देखील तपासणी केल्याची प्राथमिक माहिती आहे. इंदापूर तालुक्यातही खासगी दूध प्रकल्पाशी संबंधित ठिकाणी यंत्रणेने छापे घातल्याची चर्चा आहे. फलटणमध्ये देखील दूध प्रकल्पाशी संबंधितच ही चौकशी असल्याची समजते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.