Breaking News, धुळे :- बाप नाही सैतान! पत्नीने दारूला पैसे दिले नाहीत, दोन्ही मुलांची तापी नदीत फेकून हत्या
धुळे : बायकोने दारू प्यायला पैसे दिले नाहीत, म्हणून जन्म देणाऱ्या बापानेच दोन्ही मुलांना तापी नदीत फेकून त्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
धुळे जिल्ह्यातील थाळनेर गावात ही संतापजनक घटना घडली आहे. कार्तिक कोळी आणि चेतना कोळी असं मृत्यू झालेल्या दोन्ही भावा-बहिणींची नावं आहेत. कार्तिक हा अवघ्या 6 वर्षांचा तर चेतना ही 3 वर्षांची होती. थाळनेर गावातील भुईकोट किल्ल्याशेजारी असलेल्या तापी नदीच्या पात्रात दोन लहान मुलांचे मृतदेह गावकऱ्यांना तरंगताना आढळून आले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी लगेचच पोलिसांना बोलावलं आणि मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून पत्नीसोबत वाद झाल्यानंतर बापानेच दोन्ही मुलांना तापी नदीच्या पात्रात फेकल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी पत्नी छायाबाई कोळी हिच्या फिर्यादीवरून थाळनेर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर थाळनेर पोलिसांनी आरोपी संजय कोळी याला अटक केली आहे. या घटनेमुळे थाळनेर गावात खळबळ उडाली असून, या नराधम बापाला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.