नागपूर : मुस्लिम समाजात दुर्दैवाने ठराविक व्यवसाय लोकप्रिय आहेत. खरे तर मुस्लिम समाजाने शिक्षणाची अधिक कास धरावी. समाज जितका सुशिक्षित होईल तितके गरिबीचे प्रमाणे दूर होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरातील
सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ फार्मसीच्या दीक्षांत समारोह प्रसंगी बोलत होते.
यावेळी सर्वात जास्त शिक्षणाची गरज मुस्लिम समाजाला असल्याचे नितीन गडकरी
म्हणाले.
गडकरी म्हणाले, मुस्लिम समाजाने शंभर वेळा मशिदीमध्ये जाऊन नमाज पठन करावे. कुणाची काही हरकत असायचे कारण नाही पण त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान आत्मसात केले नाही तर त्यांच्या भविष्याचे काय? असा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित केला. सर्वात जास्त शिक्षणाची गरज मुस्लिम समाजाला आहे. यासाठी मी विधान परिषदेचे आमदार असताना मला मिळालेली इंजिनिअरिंग कॉलेज अंजुमन इन्स्टिट्यूटला दिल्याचे गडकरी यांनी सांगितले. मुस्लिम समाजात अधिकाधिक डॉक्टर, वकील, इंजिनियर घडले तर समाजाचा विकास होईल असेही ते म्हणालेत.
महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये आमदार असताना मला एक इंजिनिअरिंग कॉलेज मिळालं होतं. त्यावेळी ते कॉलेज अंजुमन इस्लाम इन्स्टिट्यूटला दिले होते. पानठेला, चाय टपरी, दुकान, ट्रक ड्रायव्हर, क्लिनर... हे पाच धंदे दुर्दैवाने मुस्लिम समाजात लोकप्रिय आहे. मस्जिदमध्ये एक वेळ नाही तर शंभर वेळा नमाज पडा पण विज्ञान आणि तंत्रज्ञानाला आत्मसात केले नाही तर आपले भविष्य अंधकारमय असेल, अशी भीती गडकरी यांनी व्यक्त केली.डॉ. अब्दुल कलाम यांनी केलेले काम देशभरात नाही तर जगभरात मोठे योगदान देणारे ठरले. कोणताही व्यक्ती जात, पंथ, धर्म आणि वेशभूषा याने मोठा होत नाही तर गुणाने मोठा होतो. त्यामुळे जात, धर्म, पंथ या आधारावर कुणीही भेदभाव केलेले मला आवडत नाही. अनेक जाती-धर्माचे लोक मला भेटायला येतात. त्यावेळी त्यांना मी स्पष्टपणे सांगतो जो करेगा जात की बात, उसको कस के मारुँगा लाथ... असे गडकरी म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.