घरदार झोपलं होतं, अचानक 14 वर्षांची मुलगी ओरडू लागली, घडलेला प्रकार पाहून कुटुंब हादरलं!
लातूर: लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यात रक्त्याच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका व्यक्तीने आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. पीडित मुलगी झोपलेली असताना आरोपी बापामधील राक्षस जागा झाला आणि त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. अत्याचार होताना पीडित मुलीनं आरडाओरड केली. यानंतर नराधम बापाचं काळं कृत्य समोर आलं आहे. याप्रकरणी बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील एका गावात घडली आहे. इथं ४५ वर्षीय आरोपी आपली पत्नी आणि १४ वर्षांच्या मुलीसह वास्तव्याला आहे. तो मजूर म्हणून काम करतो. मंगळवारी रात्री घरातील सर्वांनी एकत्रित बसून जेवण केलं होतं. जेवणानंतर घरातले १४ वर्षीय पीडित मुलीसह घरातील सगळे झोपी गेले होते.
पण काही वेळानंतर नराधम बापाला जाग आली. त्याची नजर बाजुला झोपलेल्या १४ वर्षीय मुलीवर गेली. यावेळी आरोपीनं झोपेत असलेल्या मुलीसोबत लैंगिक चाळे करायला सुरुवात केली. तिच्यासोबत घडणारा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित मुलीला जाग आली. यावेळी आरोपीनं जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडितेनं आरडाओरड केली. पीडितेचा आवाज ऐकून तिची आई जागी झाली.
मुलीसोबत घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस ठाणं गाठलं. आपल्याच पतीविरोधात त्यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पण ४५ वर्षीय बापाने अशाप्रकारे पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.