Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विधानसभेत 200 पेक्षा जास्त मराठा आमदार तरी...', प्रकाश आंबेडकरांनी केला जळजळीत प्रश्न

विधानसभेत 200 पेक्षा जास्त मराठा आमदार तरी...', प्रकाश आंबेडकरांनी केला जळजळीत प्रश्न
 

विधानसभेच्या अधिवेशनाला सुरुवात आजपासून (सोमवार) झाली आहे. मात्र, या अधिवेशानाच्या पूर्वसंध्येला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मराठी आमदारांवर निशाणा साधला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य प्रशांत कोरटकर याने केले. तर, शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेविषयी अभिनेता राहुल सोलापूरकर याने वादग्रस्त वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आमदारांना जळजळीत प्रश्न विचारला आहे.

आंबेडकर यांनी ट्विट करत 'महाराष्ट्र विधानसभेत 200 पेक्षा जास्त मराठा आमदार आहेत. किती लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानजनक व्यक्तव्याच्या विरोधात भूमिका घेतली? किती जणांनी आंदोलन केले?', असा प्रश्न उपस्थित केला आहे.

'छत्रपती शिवाजी महाराज यांचा उपयोग राजकारणासाठी होतोय का? विचारसरणीशी काही देणे घेणे नाही का?', असा टोला देखील आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमधून लगावला आहे. इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणी आणि शिवाजी महाराजांचा अवमान केल्या प्रकरणी प्रशांत कोरटकर याच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या ट्विटनंतर वंचितच्या राज्य उपाध्यक्षा पिंकी दिशा शेख यांनी प्रकाश आंबेडकर यांचे ट्विट रिट्विट करत म्हटले आहे की, 'हे सगळे राजकीय पक्षांचे गुलाम झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाला तरी हे एका शब्दाने बोलणार नाहीत. हे वास्तव आहे.राजकारणासाठी हे काहीही करू शकतात.'

कोरटकरला अटक करण्याची मागणी
प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केलेले आहे. सरकार त्याच्या विरोधाक कारवाई करण्यापेक्षा त्यालाच संरक्षण देत आहे. सरकारने कोरटकरला ताबडतोब अटक करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.