तब्बल 58 तास 35 मिनटे किस करण्याचा रेकॉर्ड करणाऱ्या 'त्या' विवाहित जोडप्याचं पुढे काय झालं माहितीये?
सोशल मीडियावर एका चर्चित दांपत्याच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. याचं कारण या विवाहित दांपत्याने 12 वर्षांपूर्वी एक असा रेकॉर्ड केला होता, जो आजपर्यंत कोणीही तोडू शकलेलं नाही. थायलँडच्या एक्काचाई तिरानारात आणि त्यांची पत्नी लकसाना यांनी 2013 मध्ये 58 तास 35 मिनिटं सलग किस करत गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली होती. पण आता ही जोडी वेगळी झाली आहे.
12 वर्षांनी घटस्फोट, पण रेकॉर्डचा आजही गर्व
बीबीसी साऊंड्सने 'विटनेस हिस्ट्री' पॉडकास्टमधील चर्चेदरम्यान, एक्काचाईने या ब्रेकअपच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यादरम्यान त्याने आपल्यासाठी तो रेकॉर्ड आजही गर्वाचा क्षण असल्याचं सांगितलं आहे. मला फार अभिमान वाटतो. हा आयुष्यात एकदाच येणारा अनुभव आहे. आम्ही फार वेळ एकत्र घालवला आणि मला ते सुंदर क्षण लक्षात ठेवायचे आहेत असं त्याने सांगितलं. एक्काचाई तिरानारात आणि त्यांची पत्नी लकसानाने 12 वर्षांपूर्वी सलग 58 तास 35 मिनिटं किस करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. थायलंडच्या या दांपत्याने 2013 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केली होती. पण आता त्यांनी वेगळे मार्ग स्विकारले आहेत.
बाथरुम ब्रेकमध्येही साथ सोडली नाही
हा वर्ल्ड रेकॉर्ड करताना जोडप्याला अनेक कडक नियमांचा सामना करावा लागला. बाथरुम ब्रेकमध्येही दोघं एकमेकांना किस करत होते. आपला अनुभव सांगताना त्यांनी म्हटलं की, आम्ही एकमेकाला जागं ठेवण्यासाठी एकमेकांच्या डोक्यावर हाताने मारत होते. आम्ही मूर्तीप्रमाणे उभे होतो आणि एकमेकांच्या तोंडानेच पाणी ट्रान्सफर करत होतो.
आधीही केला आहे वर्ल्ड रेकॉर्ड
विशेष बाब म्हणजे, याआधी 2011 मध्येही या जोडप्याने 46 तास 24 मिनिटं सलग किस करण्याचा रेकॉर्ड केला होता. पण दोन वर्षांनी 2013 मध्ये त्यांनी स्वत:चा रेकॉर्ड मोडला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.