विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना सभागृहात मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ पाहणे, पान, पान मसाला खाणे, तंबाखू खाणे, असंसदीय शब्दांचा वापर करणे अशी कृत्ये आमदारांकडून नेहमीच घडत असतात.
आता एक आमदार पान मसाला खाऊन सभागृहात थुंकल्याचे समोर आले आहे. हे पाहून विधानसभा अध्यक्षांनीही चांगलाच धक्का बसला. उत्तर प्रदेश विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यादरम्यान एका आमदाराने विधानसभेत थुंकल्याचे समोर आले आहे. विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांनी यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली. मंगळवारी विधानसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी त्यांनी सभागृहाची स्वच्छता करण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी सभागृह सुरू झाल्यानंतर अत्यंत कडक शब्दांत आमदारांना सुनावले.
सभागृहाची प्रतिष्ठा आणि स्वच्छता कायम ठेवण्याबाबत महाना यांनी सदस्यांना खडेबोल सुनावले. सभागृहातील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर विधानसभा प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आली होती. त्यानंतर त्यांनी अध्यक्षांनी माहिती दिली. त्यानंतर त्यांनी स्वत: सभागृहात जाऊन त्याठिकाणाची पाहणी केली आणि स्वच्छतेचे आदेश दिले.
कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष म्हणाले, विधानसभेप्रती केवळ एक व्यक्तीच नाही तर सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. या कृत्याचा व्हिडीओ उपलब्ध आहे. पण कोणत्याही सदस्याला सार्वजनिक पध्दतीने अपमानित करण्याचा आपला उद्देश नाही. भविष्यात कुणी असे करताना आढळून आल्यास त्यांना तिथे थांबवा, असे आवाहनही त्यांनी आमदारांना केले.
स्वत:हून पुढे या!
महाना यांनी संबंधित सदस्यांनी स्वत:हून पुढे येत आपली चूक मान्य करावी, असेही आवाहन केले. त्यांनी असे न केल्यास मी बोलवून घेईन. उत्तर प्रदेश विधानसभा राज्यातील 25 कोटी नागरिकांच्या आस्थेचे प्रतिक आहे. त्याची स्वच्छता आणि मर्यादा राखण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे, अशी ताकीदही त्यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.