शिवद्रोही प्रशांत कोरटरकरला पोलिसांनी तेलंगणा राज्यातून अटक केली आहे. पण कोरटकरने चंद्रपुरात पोलीस अधिकारी महेश कोंडावार याची भेट घेतली होती. त्यामुळे आता पोलीस अधिकारी महेश कोंडावार अडचणीत येण्याची शक्यता आहे. शिवरायांबद्दल गरळ ओकणारा प्रशांत
कोरटकर याची चंद्रपुरात कथित भेट घेणारे पोलिस अधिकारी महेश कोंडावार
अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महेश कोंडावार हे चंद्रपुरात
स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख होते. मात्र त्यांची महिनाभरापूर्वी आर्थिक
गुन्हे शाखेत बदली झाली होती. या बदलीमुळे कोंडावार नाराज होते.
तेव्हापासून कोंडावर कर्तव्यावर रुजू झालेले नाहीत. ते अजूनही रजेवर आहेत.
इंद्रजीत सावंत प्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकर हा अकरा मार्च रोजी चंद्रपुरात मुक्कामी होता. तेव्हा कोरटकरने गुंडावार यांची भेट घेतली होती असे सांगितले जाते. या अनुषंगाने कोल्हापूर पोलिसांनी हॉटेलचे सर्व सीसीटीव्ही ताब्यात घेतले असून, त्यात जर कोंडावार आढळले, तर त्यांच्यावर मोठी कारवाई होऊ शकते. प्रकरण कोल्हापूर पोलिसांकडे असल्याने आपण काही बोलू शकत नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रपूर पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.