भारतामध्ये अनेक यूपीआय वापरकर्त्यांना यूपीआय पेमेंट करताना अडचण येत असल्याचं दिसून येत आहे. गुगल पे आणि फोन पे युजर्सनी याबाबत सोशल मीडियात तक्रारींचा पाऊस पाडला आहे. डाऊनडिटेक्टरनेही या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे. भारतामध्ये लाखो लोक
यूपीआय अर्थात युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसचा वापर करतात. काहींनी तर कॅश
बाळगणं सोडून दिलं आहे. भाजीवाल्यांपासूरन ते एसटीच्या तिकिटांपर्यंत
यूपीआय पेमेंटचा वापर होतो आहे.
त्यामुळे त्यात काही बिघाड झाला तर वापरकर्त्यांची मोठी गोची होते. बुधवार, दि. २६ मार्च रोजी सायंकाळच्या दरम्यान अनेक युजर्सना यूपीआय पेमेंट करताना अडचणी निर्माण झाल्या. अनेकांनी सोशल मीडियावर याबाबत नाराजी बोलून दाखवली आहे. सायंकाळी ७ नंतर यूपीआय पेमेंटबाबात साधारण २३००० तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.