वाढीव घरपट्टीबाबत योग्य मार्ग काढा: समित कदम
मिरज: सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेच्या वाढीव घरपट्टीबाबत नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे याबाबत त्वरित योग्य तोडगा काढावा, अशी मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेने वाढीव घरपट्टी आकारणी सुरु केली आहे. ही घरपट्टी मागील घरपट्टीपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे घरपट्टी कोणत्या अनुषंगाने वाढवली, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. घरपट्टी ही महापालिका क्षेत्र विकासासाठी महत्त्वाची आहे.
परंतु अनेक ठिकाणी दुप्पट, तिप्पट घरपट्टी आकारणी झाली आहे. याबाबत पुनर्विचार होऊन घरपट्टीबाबत बैठक घ्यावी. नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये मध्यस्थी करून घरपट्टीबाबत योग्य तो मार्ग काढावा. राज्यातील इतर 'ड' वर्ग महापालिकेमध्ये कोणत्या पद्धतीने घरपट्टी आकारली जात आहे. याबाबतचा अभिप्राय घेऊन प्रचलित दराप्रमाणे घरपट्टी आकारावी. नवीन घरपट्टी आकारणीला स्थगिती मिळावी. ज्यांना कमी घरपट्टी आली आहे, त्यांची घरपट्टी भरून घ्यावी. ज्यांना ज्यादा घरपट्टी आकारण्यात आली आहे, तीरद्द करावी दरम्यान, हे निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी समित कदम यांना याबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. शिवाय नगरविकास विभागाचे उ अतिरिक्त सचिव गोविंदराज यांना त्यांनी याबाबत अभ्यास करून निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.