Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आजारांपासून वाचायचं असेल तर बाथरुममध्ये ठेवलेल्या 'या' ३ टॉक्सिक वस्तू लगेचच फेका बाहेर

आजारांपासून वाचायचं असेल तर बाथरुममध्ये ठेवलेल्या 'या' ३ टॉक्सिक वस्तू लगेचच फेका बाहेर
 

स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते. दिवसभर आपण अनेक गोष्टी करतो, अनेक गोष्टी वापरतो. याचे शरीरावर चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम होऊ शकतात. कधीकधी काही गोष्टी निरोगी दिसतात पण त्या आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात म्हणून तुमच्या जीवनशैलीकडे आणि दैनंदिन सवयींकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. आपण नकळत अनेक चुका करू लागतो, ज्यामुळे आजारी पडण्याचा धोका वाढतो. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी अशाच एका चुकीबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की बाथरूममध्ये ठेवलेल्या ३ टॉक्सिक वस्तू ताबडतोब बाहेर फेकून द्याव्यात.

३ महिन्यांपेक्षा जुना टूथब्रश

डॉक्टर म्हणाले, अलीकडील संशोधनानुसार, ७५ टक्के लोक शिफारस केलेल्या वेळेपेक्षा जास्त टूथब्रश वापरतात. तज्ञांचा सल्ला आहे की, तुम्ही जास्तीत जास्त ३ महिने टूथब्रश वापरावा. ३ महिन्यांनंतर, टूथब्रशची ३० टक्के स्वच्छता क्षमता कमी होते आणि त्यावर बॅक्टेरिया जमा होऊ लागतात.

कमी धार असलेले रेझर ब्लेड
कमी धार असलेले रेझर ब्लेड फेकून द्या. डॉक्टरांच्या मते, त्यांचा वापर केल्यामुळे त्वचेवर जळजळ होण्याचा धोका १० पटीने वाढतो. ५ ते ७ वेळा वापरल्यानंतर तो फेकून द्यावा. अशा प्रकारे तुम्ही त्वचेचं नुकसान आणि संसर्ग टाळू शकतो.
अँटी-मायक्रोबियल माउथवॉश

तोंडातील बॅक्टेरिया मारण्यासाठी लोक अँटीमायक्रोबियल माउथवॉश वापरतात. रिसर्चमधून असं दिसून आलं आहे की, अँटीमायक्रोबियल माउथवॉश तोंडात असलेले फायदेशीर बॅक्टेरिया देखील नष्ट करू शकतात. यामुळे बॅक्टेरियांची संख्या कमी होऊ शकते.

हेल्दी ओरल टिप्स
NHS नुसार, तुमचे दात आणि हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. दिवसातून दोनदा दात घासा आणि दातांमधील स्वच्छतेची देखील काळजी घ्या. साखर, कॅफिन आणि अल्कोहोल कमी करा. तसेच दातांचं नियमित चेकअप करा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.