सांगली : मिरज तालुक्यातील एका गावातील आठ वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ६५ वर्षीय नराधम वृद्धाला सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. सुभाष उर्फ भैय्या गोविंद कांबळे असे त्याचे नाव आहे. २६ फेब्रुवारी ही घटना घडली. पीडितेच्या पालकांनी ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. दरम्यान, जत तालुक्यातील घटनेनंतर ही घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षितेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पीडितेला ५५ वर्षीय महिलेने दत्तक घेतले आहे. मिरज तालुक्यातील एका गावात राहण्यास असून पीडिता तिसरीला शिकण्यास आहे. संशयित नराधम कांबळे हा शेजारीच राहतो. तो मोलमजुरी करत असून २६ फेब्रुवारी रोजी दुपारी पीडिता अंगणात खेळत होती.
संशयित कांबळे याने पीडितेला आपल्या घरात बोलवून घेतले. त्यानंतर जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. भयभीत पीडिता घरी गेली. तिला त्रास जाणवून लागल्याने ती रडू लागली. पीडितेला घरगुती उपचार करण्यात आले. परंतू अधिकचा त्रास होवू लागल्याने रूग्णालयात दाखवण्यात आले. त्यावेळी हा प्रकार समोर आला. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात सुधारित बाललैंगिक अपराधापारसून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंद केला. पोलिस निरीक्षक किरण चौगले यांनी संशयितास न्यायालयासमोर हजर केले असता त्याला १९ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहायक निरीक्षक कल्याणी शिंदे या अधिक तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.