चुकूनही फिश स्पा करू नका, नाहीतर तुम्ही या आजारांना बळी पडू शकता! वाचा सविस्तर
अलीकडे सुंदर दिसण्यासाठी अनेक नवनवीन प्रयोग करण्यावर भर दिला जात आहे. त्यातलाच एक म्हणजे फिश स्पा. बरेचजण तर आपले सौंदर्य वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या ब्युटी ट्रीटमेंटचाही अवलंब करतात. स्पा आणि ब्युटी पार्लरमध्ये फेशियल, वॅक्सिंग आणि पेडीक्योर सारखे ब्युटी ट्रीटमेंट केले जातात. असं असलं तरी, फिश पेडीक्योर किंवा फिश स्पा सध्याच्या घडीला खूप लोकप्रिय होत आहे. मॉलमध्ये प्रामुख्याने फिश स्पा आपल्याला दिसून येतात. फिश पेडीक्योर हे खरंतर मसाजसारखे आहे, जे तुम्हाला मानसिकरित्या आराम देते असे म्हटले जाते. पण फिश स्पा करून घेतल्याने तुम्ही अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता.
फिश स्पा करण्याचे तोटे
फिश स्पा करून घेतल्यास आपण सोरायसिस, एक्झिमा आणि एड्स सारख्या गंभीर आजारांना बळी पडू शकतो. फिश स्पा करून घेतल्याने आपल्याला त्वचेच्या संसर्गाचा धोका देखील वाढतो. टाकीमध्ये माशांसोबत अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात. त्यामुळेच आपण या जीवाणूंच्या संपर्कात आलो तर, आपल्यालाही संसर्ग होण्याचा धोका असतो. यामुळेच अमेरिका आणि कॅनडासह जगातील अनेक देशांमध्ये फिश स्पावर बंदी आहे.(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
फिश स्पा केल्याने आपल्या त्वचेचा रंगही खराब होऊ शकतो. पेडीक्योर योग्यरित्या केले नाही तर त्वचा खडबडीत होऊ शकते. फिश स्पा दरम्यान आपला अंगठा आणि नखे खराब होऊ शकतात. बऱ्याचदा मासे आपली नखे चावतात, त्यामुळे नखांनाही इजा पोहोचू शकते. फिश स्पा किंवा फिश पेडीक्योर करणे खूप अस्वच्छ मानले जाते. टाकीतील पाणी स्वच्छ न केल्याने अनेक आजारांचा धोका असतो. फिश स्पा घेत असताना, जर माशांमुळे त्वचेवर वेदना किंवा ताण जाणवत असेल, तर ताबडतोब तुमचे पाय बाहेर काढा. याशिवाय, त्वचा संवेदनशील असेल किंवा जखम झाली असेल तर या प्रकारच्या स्पा टाळा कारण त्यामुळे संसर्ग होऊ शकतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.