Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अंजली दमानिया यांचा मोठा आरोप, म्हणाल्या; "प्रशांत कोरटकर ब्राह्मण आहेत म्हणून.."

अंजली दमानिया यांचा मोठा आरोप, म्हणाल्या; "प्रशांत कोरटकर ब्राह्मण आहेत म्हणून.."
 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ केल्याचा आरोप डॉ. प्रशांत कोरटकरवर आहे. तरीही पोलिसांनी कोरटकरला अटक केली नाही. याप्रकरणी आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत. “खोक्याची गाडी लगेच जप्त केली मग Rolls Royce का जप्त केली नाही? छत्रपती संभाजी महाराजांपेक्षा दुसरे अस्तित्व या राज्यात कोणाचे आहे का?,” असा सवाल दमानिया यांनी केला.

“छत्रपती संभाजीराजांचा अपमान करणे यापेक्षा कोणताच गुन्हा मोठा असू शकत नाही, तरी देखील प्रशांत कोरटकरवर कारवाई होत नाही. सर्वांना समान भूमिकेतून न्याय मिळायला हवा,” अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. पुढे त्या म्हणाल्या, “प्रशांत कोरटकरची Rolls Royce जप्त तर सोडा, ती कुठून आली त्याची साधी चौकशी होत नाही. का? ते ब्राह्मण आहेत म्हणून ? हा जातीवाद बंद झाला पाहिजे. सिलेक्टिव अॅक्शन घेणे चुकीचे आहे,” असाही सल्ला दमानिया यांनी दिला. दरम्यान, प्रशांत कोरटकरवरून अंजली दमानिया चांगल्याच भडकल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी केलेली मागणी मान्य होते का? आणि प्रशांत कोरटकरला अटक होते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.