पोलीस ठाण्याचा संपूर्ण कारभार महिलांच्या हाती ! महिला दिनानिमित्त महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात उपक्रम
आज जागतिक महिला दिन विविध उपक्रमानी साजरा केला जात आहे. कुठे महिलांचा सन्मान तर कुठे परिसंवाद, चर्चासस्त्रे असे उपक्रम राबवले जात आहेत. सांगली जिल्ह्यातील मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी आज ठाण्याचा संपूर्ण कारभार महिला अधिकारी, अंमलदार यांच्याकडे सोपवून आगळा वेगळा उपक्रम राबवला. या वेगळ्या उपक्रमाचीच जिल्ह्यात चर्चा सुरु आहे.
आज शनिवारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेमध्ये आत्मविश्वास वृधींगत व्हावा तसेच त्यांचा सन्मान व्हावा यासाठी यांनी मिरज उपविभागातील महात्मा गांधी चौक पोलीस कडील संपूर्ण कारभार महिला अधिकारी व अंमलदार यांचेकडे सोपविला. महिला अधिकारी व अंमलदार यांना महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील दिवसभर दिवस अधिकारी, ठाणे अंमलदार, सीसीटीएनएस प्रणाली, वायरलेस विभाग, लॉकअप गार्ड, बीट मार्शल पेट्रोलिंग त्याचप्रमाणे डायल ११२ पेट्रोलिंग असे कर्तव्य नेमण्यात आले आहे. पोलीस ठाणेकडील सर्व कामाची जबाबादारी व कामकाजाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार महीला पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना देण्यात आलेले आहेत.
पोलीस ठाणेत येणारे तक्रारदार यांच्या तक्रारी योग्यरीत्या नोंदवून घेत आहेत. तसंच गहिलांनी पोलीस ठाणेस येणारे लोकांना योग्य समुपदेशन करणे, नविन कायदयांची माहिती देणे, त्याचप्रमाणे बीट मार्शल व डायल ११२ ने संपूर्ण पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पेट्रोलिंग करुन वाहतूकीचे नियम मोडणा-यांवर कारवाई करीत दंड वसूल करुन वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी नागरीकांचे समुपदेशन करणे व पोलीस ठाणे हद्दीतील शाळा-महाविद्यालये यांना भेटी देवून महीलां विषयक कायद्याचे तसेच सायबर सुरक्षेच्या अनुगंगाने मार्गदर्शन करणे आदी कर्तव्य उत्कृष्ठरित्या बजावले.महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्वत पोलीस वाहन व मोटार सायकल चालवित म. गांधी चौक पोलीस ठाणेहद्दीत रमजान ईद व बलीदान मास अनुषंगाने पेट्रोलीग करीन कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त पार पाडला आहे. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक रुपाली गायकवाड, सहा. पोलीस उपनिरीक्षक माया चव्हाण, रंजना बेडगे, साक्षी पतंगे, रंजना कलगुटगी, सीमा यादव, उज्वला बांडगी, महादेवी माने, स्वप्नाली निकम यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.