महिलेच्या त्रासाला कंटाळून तरुणाने संपवले जीवन
बार्शी : आगळगाव (ता. बार्शी) येथे एका महिलेने तरुणास माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू मला पैसे आणून दिले नाहीस. भेटायला घरी आला नाहीस तर पोलिसांत तक्रार देऊन तुला अडकवते, अशी धमकी दिल्यामुळे तरुणाने राहते घराजवळील पत्र्याच्या शेडला गळफास घेऊन आत्महत्या केली. तालुका पोलिस ठाण्यात आगळगाव येथील संशयित महिलेविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
रामचंद्र नारायणकर (वय ६६) यांनी फिर्याद दाखल केली. सागर रामचंद्र नारायणकर (वय २५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवार दुपारी साडेपाच वाजता उघडकीस आली. फिर्यादीत असे म्हटले आहे, सागरवर माझे प्रेम आहे. मी सागरसोबत राहणार आहे. तू मला रोज पैसे आणून द्यायचे. पैसे दिले नाही, तू घरी आला नाही, तर मी पोलिसांत तुझ्याविरोधात तक्रार दाखल करीन, अशी धमकी देत होती. मंगळवारी दुपारी सागर व त्याची आई घरी असताना संशयित महिला घरी येऊन गेली आणि सागरशी भांडण करून धमकी देऊन निघून गेली. त्यानंतर दुपारी पावणेपाचनंतर सागरने आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.