Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

... म्हणून बांग्लादेशी घुसखोर सांगलीत आला

... म्हणून बांग्लादेशी घुसखोर सांगलीत आला



सांगली : सांगली शहर पोलिसांनी रविवारी सकाळी पेट्रोलिंगवेळी अटक केलेला बांग्लादेशी घुसखोर अमीर शेख ऊर्फ एम डी अमीर हुसेन (वय 62, रा. उत्तर अदाबोर, मोहम्मदपूर, ढाका, बांग्लादेश) हा सांगलीत कसा आला, याचा उलगडा पोलिसांनी केला आहे. पुणे, मुंबई शहरे महागडी असून त्याला सांगली, कोल्हापूरसारख्या निमशहरी भागात जाण्याचा सल्ला मिळाला. तो शिवशाही बसने सांगलीत आल्याचे तपासात समोर आले आहे. पण एकाच दिवसात तो शहर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. 


सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवस कोठडी सुनावली. शनिवारी रात्री शहर पोलिस ठाण्याकडे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या नेतृत्वाखालील पथक पेट्रोलिंग करीत होते. रविवारी सकाळी या पथकाला शहरातील पटेल चौक ते आमराई रस्त्यावर अमीर हुसेन संशयितरित्या मिळून आला. त्याची चौकशी केली असता त्याने दिल्लीचा रहिवासी असल्याचे आधार कार्डही दाखवले. उपनिरीक्षक पोवार यांना त्याच्या बोलण्याचा संशय आला. त्याला मराठी समजत नव्हते. हिंदी बोललेले फारसे कळत नव्हते. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. अखेर शेख याने तो बांग्लादेशातील ढाका येथील असल्याचे कबूल केले. शहर पोलिसांनी त्याला अटक केली. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.