करेवाडी (ता. जत) येथील सराफी दुकानातून हातचलाखीने सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या कर्नाटकातील घरातून 1 लाखांचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली. त्या गुन्हेगाराचा शोध सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. करेवाडी येथील बिरदेव सरगर यांच्या
मोरया ज्वेलर्स या दुकानात सोने खरेदीच्या बहाण्याने एकजण 19 फेब्रुवारी
रोजी आला होता. त्यावेळी त्याने हातचलाखीने 12 ग्रॅमचे दागिने लंपास केले
होते. याप्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यातील चोरट्याला पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज
पवार यांचे पथक तयार केले होते. पथकातील सागर लवटे यांना ही चोरी मोहम्मद
अली बाबर अली ईराणी (रा. श्रीकृष्ण नगर, गदग, कर्नाटक) याने केल्याची
माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने कर्नाटकातील त्याच्या घरी जाऊन छापा
टाकला. मात्र तो पसार झाला होता. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याच्या
घराची झडती घेतल्यावर चोरीचे 12 ग्रॅमचे दागिने सापडले.
ते जप्त करण्यात आले. ते दागिने उमदी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक पंकज पवार, सागर लवटे, महादेव नागणे, संदिप गुरव, सतिश माने, मछिंद्र बर्डे, अनिल कोळेकर, अमर नरळे, नागेश खरात, आमसिद्धा खोत, संदिप नलावडे, उदय माळी, विक्रम खोत, केरूबा चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.