काहीच दिवसांपूर्वी महिलेची छेड काढल्याचे कारण देत सतीश भोसले उर्फ खोक्या भाईने एका तरूणाला मारहाण केली होती. त्या क्रूर मारहाणीचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. ज्यामुळे राज्याभर संताप व्यक्त झाला होता. यानंतर त्याला अटकही झाली. पण अशा घटना काही कमी होताना दिसत नसून कोल्हापुरातही अशीच मारहाणीची घटना उघडकीस आली आहे. हातकणंगले तालुक्यातील माले येथे व्यवसायाच्या कारणातून एकाला बेदम मारहाण झाली आहे. इतकेच नव्हे तर, 'गाव सोडून जा, अन्यथा तुझ्या बायकोवर सगळ्यांना रेप करायला लावीन', अशी धमकी संशयीतांकडून देण्यात आल्याने गुन्हा हातकणंगले पोलिसात दाखल झाला आहे. या घटनेच्या उघडकीनंतर आता जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
हातकणंगले तालुक्यातील माले येथे व्यवसायांमध्ये धुमसत असलेल्या वादातून एकाच्या मारहाण करण्याची घटना घडली आहे. मारहाणीचा व्हिडिओ देखील काढण्यात आला असून संशयतांकडून लाकडी काठी व रॉडने पाठीवर व पायावर वर्मी घाव घालून वळ उठेपर्यंत मारहाण करण्यात आली आहे. तसेच 'गाव सोडून जा, अन्यथा तुझ्या बायकोवर सगळ्यांना रेप करायला लावीन', अशी धमकी संशयीतांकडून देण्यात आल्याचेही समोर आले आहे. यामुळे संशयीतावर गुन्हा हातकणंगले पोलिसात दाखल झाला आहे.
हातकणंगले तालुक्यातील माले येथील बाबा हॉटेलमध्ये ही घटना घडली. येथे मेनू कार्ड बघण्याच्या कारणावरून मारहाण झाली. याबाबत फिर्यादी अभिषेक छत्री भोपारी (वय वर्ष- 24, रा. नेपाळ सध्या रा. हेरले ता. हातकणंगले) यांनी बाबतची तक्रार दिली आहे. याबाबत संशयित आरोपी टिपूसुलतान खतीब, मोहम्मद कुरेशी, प्रवीण नाथा पाटील, मनोज संजय कांदे यांच्याविरुद्ध हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. हॉटेल मालक हे तिघे भाऊ असून हॉटेल बाहेर सत्ताधारी मंत्री, खासदार, आमदार यांचेसह राजकीय नेत्यांचे फोटो लावून दहशत पसरवत असल्याचेही नागरिकांतून बोलले जात आहे.याबाबत हातकणंगले पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, तारीख 17 रोजी दुपारी तीन वाजता कोल्हापूर-सांगली मार्गावरील माले गावचे हद्दीत हॉटेल बाबा नावाचे बार व हॉटेल आहे. हॉटेल नजीक असलेल्या पानटपरीमध्ये फिर्यादी अभिषेक छत्री भोपारी हा थांबला होता. त्याला संशयित आरोपी मनोज कांदे याने हॉटेलमध्ये बोलवून घेतले. तो मेनू कार्ड बघत असताना संशयित आरोपी मोहम्मद कुरेशी, प्रवीण पाटील व मनोज कांदे यांनी फिर्यादी अभिषेक यांचे सोबत असलेल्या जितूकुमार यास हॉटेलचे मेनू कार्ड का बघितलास असे म्हणून काठीने व लोखंडी रॉडने पाठीवर व पायावर मारहाण करून जखमी केले.तसेच संशयित आरोपा टिपू सुलतान खलिफा यांने अभिषेक याच्या डोकीस मिलिटरी चॉकलेटी रंगाची पिस्तूल लावून दारू पाजली आणि त्याचा व्हिडिओ काढला. त्याच्यासोबत असलेल्या जितुकुमार याने आम्हाला चाच्यांनी पाठवले आहे, असे म्हणत फिर्यादी अभिषेकला, "तू आणि तुझी बायको उद्याच्या उद्या निघून जा. नाहीतर तुझ्या बायकोवर बलात्कार करायला लावीन," अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटल्याचे हातकणंगले पोलीसांनी माहिती दिली आहे. पुढील तपास हातकणंगले पोलीस करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.