अद्ययावत मॉडयूलर ओ.टी. कामासाठी सिव्हील हॉस्पीटल सांगलीत नियमित
शस्त्रक्रिया बंद राहणार - तातडीच्या शस्रक्रिया सुरू राहणार - नियमित
शस्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे होणार
सांगली, दि. 7 : पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली या रुग्णालयात एकूण 7 शस्त्रक्रियागृह कार्यरत असून त्यापैकी 5 शस्रक्रियागृहे मॉड्यूलर ओ.टी. करण्याचे काम सोमवार, दि.10 मार्च 2025 पासून सुरु करण्यात येणार आहे. त्याकरिता अंदाजे 6 महिने इतका कालावधी लागणार आहे. या कालावधीत या रुग्णालयातील नियमित शस्त्रक्रिया बंद राहतील. सदर नियमित शस्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे सुरु राहतील. तातडीच्या शस्रक्रिया नेहमीप्रमाणे या रुग्णालयातील 2 शस्त्रक्रियागृहात सुरु राहतील, असे पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.