Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

''लालकृष्ण आडवणींची स्थिती बघितल्यावर कैदेतील शहाजहानची आठवण येते''; संजय राऊतांची भाजपवर खोचक टीका!

''लालकृष्ण आडवणींची स्थिती बघितल्यावर कैदेतील शहाजहानची आठवण येते''; संजय राऊतांची भाजपवर खोचक टीका!
 

औरंगजेबाची कबरी हटवण्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलच तापलं आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका टिप्पणी आणि आरोपी प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही यावरून भाजपाला लक्ष्य केलं आहे. संजय राऊत यांनी 'सामना'तील रोखठोक सदरातून भाजपावर टीका केली आहे. ''लालकृष्ण आडवाणींची स्थिती पाहिल्यावर कैदेतील शहाजहानची आठवण आल्याशिवाय राहात नाही'', असे ते म्हणाले. दरम्यान, संजय राऊतांच्या या विधानानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

''ज्यांना औरंगजेबाचे थडगे पाडायचे आहे, त्यांना हा ताजमहालही उखडायचा आहे काय?'' असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. ''औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात राजकारण होते हे योग्य नाही. औरंगजेबाचे थड़गे हे मराठा शौर्याचा विजयस्तंभ आहे. तो स्तंभ पाडू पाहणारे इतिहासाचे शत्रू आहेत. थडग्यातला औरंगजेब महाराष्ट्रातल्या मूर्खांनी जिवंत केला. तो त्यांच्याच मानगुटीवर बसला'', अशी टीकाही त्यांनी केली.

''१९९० साली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे औरंगाबाद या शहरात आले. त्यांनी औरंगदेबाची कबर खोदा असे सांगितले नाही. तर औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करून औरंगजेबाचे अस्तित्वच येथे संपवले. औरंगाजेबाच्या अनेक बेगमा होत्या. पण हिराबाईवर त्याचे प्रेम होते. ती सुद्धा गुजरातचीच होती. आता दिल्लीत गुजराती राज्यकर्त्यांचीच सत्ता आहे. त्याच राज्यकर्त्यांच्या समर्थकांना औरंगजेबाची कबर उखडायची आहे'', असेही ते म्हणाले. ''आता बाबर संपला आहे. हिंदू-मुसलमानांचा झगडा लावण्याची बाबराची क्षमता आता संपली आहे. पाकिस्तानमुळेही देशात दंगे पेटत नाहीत. हे लक्षात आल्यावर कबरीतला औरंगजेब बाहेर काढण्याची योजना आली'', असा दावाही संजय राऊत यांनी केला.

''औरंगजजेबाने त्याचा बाप, भाऊ यांना तुरूंगात डांबले अथवा संपवले. लालकृष्ण आडवणी यांची स्थिती पाहिल्यावर अनेकांना कैद झालेल्या शहाजहानची आठवण आल्याशिवाय राहत नाही. भारतामधील एक प्रख्यात सिने कुटुंब आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवते आणि आपले पंतप्रधान त्या तैमूरचे कौतुक करतात. ते सर्व औरंगजेब कबर खात्याचे लोक सहन करतात'', असा टोला संजय राऊतांनी लगावला.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.