Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संतोष देशमुख हत्याप्रकरणी केवळ राजीनामा नको तर धनंजय मुंडे यांना सहआरोपी करुन तत्काळ सुधारीत चार्जशीट दाखल करा.. सांगली शहर जिल्हा काँग्रेसची जोरदार निदर्शने व निषेध आंदोलन..

संतोष देशमुख हत्याप्रकरणी केवळ राजीनामा नको तर धनंजय मुंडे यांना सहआरोपी करुन तत्काळ सुधारीत चार्जशीट दाखल करा..  सांगली शहर जिल्हा काँग्रेसची  जोरदार निदर्शने व निषेध आंदोलन.. 


सांगली दि.४: बीड जिल्ह्य़ातील मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची आवादा कंपनी खंडणी वसूली प्रकरणी अमानुष मारहाण करुन त्यांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आली. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. याप्रकरणी हत्या करण्यात आली त्यावेळचे फोटोही सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांच्या सहभागाविषयी विधीमंडळातील आरोप व प्रसार माध्यमांनी दिलेल्या बातम्या लक्षात घेता हे प्रकरण फारच गंभीर असल्याने केवळ धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन हा विषय संपत नाही तर त्यांना या प्रकरणी सहआरोपी करुन त्यांच्यावर  ३०२ कलमाखाली कारवाई करण्यात यावी. त्यासाठी सुधारीत चार्जशीट दाखल करुन पारदर्शक तपास करावा या मागणीसाठी सांगली शहर जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीत छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने करुन निषेध आंदोलन करण्यात आले.धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करा, त्यांची आमदारकी रद्द करा, काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. 

यावेळी प्रमोद सुर्यवंशी, बिपीन कदम व प्रा. एन.डी.बिरनाळे म्हणाले, 'जनतेत दादागिरी व दहशत माजवून खंडणी वसूल करण्यासाठी हत्या करणारे गुंड व त्यांना पाठीशी घालणाऱ्या तथाकथित राजकीय नेत्यांना पाठिशी न घालता पारदर्शक तपास करुन  शासनाने हत्या करणारे आरोपी व वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना सहआरोपी करुन कठोर शिक्षा केली पाहिजे.

यावेळी बिपीन कदम, प्रा. एन.डी.बिरनाळे, रामभाऊ पाटील, मौला वंटमुरे,आशिष चौधरी आनंदराव पाटील, आनंदराव आबा पाटील, उत्तम सुर्यवंशी, प्रमोद सुर्यवंशी, ओंकार चिखले, शीतल सदलगे, मयूर पेडणेकर, मौलाली वन्टमुरे,अजिज मेस्त्री, राजेंद्र कांबळे, प्रशांत अहिवळे, अल्ताफ पेंढारी, विजय आवळे, प्रथमेश शेटे, अरुण पळसुले, इलाही बारुदवाले, गौस नदाफ, रोहन खुटाळे, सागर काळे, अरुण गवंडी,नाना घोरपडे, समीर शिकलगार, आनंदा शिंदे,विजय आवळे व काँग्रेस कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.