कडेगाव : तिने आयुष्याची नुकतीच सुरुवात केली होती. आता कुठेतरी तिच्या तोंडून आई.. बाबा नावाचे शब्द फुटू लागले होते. तिने अजून जग नीट पाहिलेही नव्हते. नुकतेच स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकली होती. चेहर्यावर स्मित हास्य घेऊन आपल्या
बहिणीसोबत ही बालिका घराबाहेर खेळायला गेली आणि तिच्यावर काळाचा घाव जोरदार
बसला. अचानक आलेल्या पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात ती रक्तबंबाळ होऊन
गंभीर जखमी झाली.पाच दिवस सुरू असलेल्या उपचारादरम्यान तिची प्राणज्योत
मालवली.
क्षणभरात तिचे आयष्य संपून गेले. नक्कीच
तिला झालेल्या वेदना शब्दात मांडता येणे कठीण आहे. असाहाय्य वेदनेनंतर
तिचा मृत्यू झाला. प्रांजली माळी असे या सहा वर्षीय बालिकेचे नाव. हा हल्ला
जरी कुत्र्याचा असला तरी नैतिक जबाबदारी नाकारलेल्या प्रशासनाच्या सुस्त
कारभाराचा मोठा फटका माळी कुटुंबाला बसला आहे. नगरपंचायत प्रशासन जागे
होणार का? मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त आता तरी होणार का? असा प्रश्न
उपस्थित होत आहे. शहरात मोकाट कुत्र्यांच्या झुंडी गल्लोगल्ली फिरत आहेत.
खाद्याच्या शोधत असलेली या कुत्र्यांनी यापूर्वीही अनेक नागरिकांवर हल्ला
केला आहे.
सुरेश थोरात , ज्येष्ठ नेते, कडेगाव.रस्त्याने जाणार्या दुचाकीस्वारच्या अंगावर कुत्री धावून येत आहेत. कुत्र्यांचा कळप वाढल्याने दहशतीचे साम्राज्य पसरले आहे. शाळेत जाणारी लहान मुले यामुळे भयभीत होत आहेत. यापूर्वी शहरात कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा, अशी मागणी झाली होती, मात्र प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. त्यावेळी कार्यवाही केली असती तर कदाचित आज झालेली घटना घडली नसती. यापुढे तरी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त नगरपंचायत प्रशासनाने करावा.डी. एस. देशमुख, अध्यक्ष, पाणी संघर्ष समिती कडेगावशहरात कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. शहरात कुत्र्याच्या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कुत्र्यांपासून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील नागरिकांतून गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. तरीही नगरपंचायत हालचाल करायला तयार नाही. निदान आता एका निष्पाप बालिकेचा बळी गेल्यानंतर तरी नगरपंचायत प्रशासन झोपेतून जागे होईल अशी अपेक्षा आहे. डॉ. पवन म्हेत्रे, मुख्याधिकारी, नगरपंचायत, कडेगावकडेगाव शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. त्याची नगरपंचायत प्रशासनाने दखल घेतली असून याबाबत तत्काळ योग्य ती कार्यवाही केली जाईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.