Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

टपरीवर चहा पिणाऱ्याने केला वाल्मिक गँगचा 'गेम ओव्हर', सरपंच देशमुख हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट

टपरीवर चहा पिणाऱ्याने केला वाल्मिक गँगचा 'गेम ओव्हर', सरपंच देशमुख हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट
 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दिवसेंदिवस मोठी माहिती समोर येत आहे. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून झालेल्या मारहाणीमुळे सुदर्शन घुले याला वाल्मीक कराडने बदला घ्यायला सांगितलं, असा खुलासा जयराम चाटे याने केला आहे. एकीकडे सुग्रीव कराडचं नाव समोर येत असताना आता आवादा एनर्जी कंपनीबाहेर टपरीवर चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शीचा जबाब महत्त्वाचा ठरला आहे. नेमकं काय झालं? वाल्मिक गँगचा पाय खोलात कसा गेलाय? जाणून घ्या.

 
टपरीवर चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शीचा जबाब
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात आवादा एनर्जी कंपनीबाहेर चहाच्या टपरीवर चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शीचा जबाब महत्त्वाचा ठरला. सहा डिसेंबर 2024 रोजी दुपारी साडेबारा वाजता सुदर्शन घुले त्याच्या साथीदारासोबत आवादा एनर्जी कंपनीच्या गेटवर पोहोचला. या दरम्यान त्याने गेटवरील वॉचमनला शिवीगाळ केली. त्याचवेळी कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे तिथे दाखल झाले त्यांना सुदर्शन घुलेने वाल्मीक कराडचा माणूस आहे. कंपनी सुरू ठेवायचं असेल तर दोन कोटी रुपये खंडणी अण्णाला द्या, अशी धमकी दिली, असा जबाब त्याठिकाणच्या चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने दिला.
तुला जिवंत सोडणार नाही - प्रत्यक्षदर्शीचा जबाब

त्यावेळी सरपंच देशमुख घटनास्थळावर दाखल झाले आणि सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदाराला कंपनी बंद करू नका, गावातील लोकांना रोजगार मिळू द्या अशी विनंती करू लागले. मात्र सुदर्शन घुलेने सरपंच तुला बघून घेऊ तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती, असा जबाब त्याठिकाणच्या चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने दिला आहे. या जबाबामुळे आरोपींचे पाय आणखी खोलात जात आहेत.
 
संतोष देशमुखांचं अपहरण कसं झालं?  घुलेचा खुलासा
संतोष देशमुख यांच्या अपहरण प्रकरणात उमरी टोल नाक्यावर सरपंचाची गाडी अडवल्यानंतर ड्राईवर साईटच्या काचेवर दगड सुधीर सांगळे याने मारला होता. दगड मारून संतोष देशमुख यांची गाडी अडवण्यात आली होती. त्यानंतर सुदर्शन घुले याने डाव्या बाजूचा दरवाजा उघडून सरपंच देशमुख यांना कॉलर धरून बाहेर खेचलं. जयराम चाटे याने त्याच्या हातातील कोयत्याने इंडिगो गाडीचा चालक शिवराज देशमुख याला धमकावलं. तसेच बळजबरीने मारहाण करत स्कार्पिओ गाडीत संतोष देशमुख यांना बसून अपहरण केलं. त्यावेळी स्कार्पिओ गाडी सुदर्शन घुले चालवत होता, अशी माहिती सुदर्शन घुले याने स्वत: दिलीये.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.